प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील २१ वा हप्ता लवकरच वितरित होणार असून, विविध त्रुटी पूर्तताअभावी पात्र लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
यासाठी विशेष मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सिडिंग करणे, मोबाइल क्रमांक बदलणे, तालुका गाव बदल करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या त्रुटींची पूर्तता करण्यात येणार आहे.
पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करावी. अधिक माहितीसाठी सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
प्रलंबित प्रकरणांची कारणे
◼️ अॅग्रीस्टॅक.
◼️ चुकीचा मोबाइल क्रमांक बदलणे.
◼️ नवीन नोंदणी नाकारलेले अर्ज अद्ययावत करणे.
◼️ बँक आधार सिडिंग.
◼️ ई-केवायसी.
◼️ जिल्हा, तालुका बदल.
◼️ भूमी अभिलेख नोंदी.
◼️ नव्याने नोंदणी.
अधिक वाचा: सहायक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळणार; शेतकऱ्यांची 'ही' कामे आता गावातच मार्गी लागणार
