Lokmat Agro >शेतशिवार > तूर्त शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणू नये; सीसीआय केंद्रांवरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत राहणार बंद

तूर्त शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणू नये; सीसीआय केंद्रांवरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत राहणार बंद

Farmers should not sell cotton for now; Cotton purchase at CCI centers will remain closed until further orders | तूर्त शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणू नये; सीसीआय केंद्रांवरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत राहणार बंद

तूर्त शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणू नये; सीसीआय केंद्रांवरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत राहणार बंद

CCI Cotton Kharedi : शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापसाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने तसेच ढगाळ वातावरणामुळे सीसीआयचे पुढील आदेश येईपर्यंत कापूस खरेदी बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणू नये असे आवाहन सभापती जयदत्त नरवडे यांनी केले आहे.

CCI Cotton Kharedi : शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापसाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने तसेच ढगाळ वातावरणामुळे सीसीआयचे पुढील आदेश येईपर्यंत कापूस खरेदी बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणू नये असे आवाहन सभापती जयदत्त नरवडे यांनी केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील बाजार समिती अंतर्गत असलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापसाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने तसेच ढगाळ वातावरणामुळे सीसीआयचे पुढील आदेश येईपर्यंत कापूस खरेदी बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणू नये असे आवाहन सभापती जयदत्त नरवडे यांनी केले आहे.

येथील बाजार समिती अंतर्गत मनकॉट जिनिंग, पूर्वा जिनिंग, कुणाल जिनिंग, कॉटसिट जिनिंग, एच.जे. कॉटन, महाराष्ट्र जिनिंग पात्रुड याठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्रावर सीसीआयकडून कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेली आहे.

त्यामुळे जिनिंगमध्ये कापूस ठेवण्यास जागा उपलब्ध नाही व वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ नये यासाठी १२ जानेवारीपासून ते सीसीआयचे पुढील आदेश येईपर्यंत शासकीय कापूस खरेदी बंद राहील याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

पुढील आदेश येईपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे, सचिव हरिभाऊ सवणे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

हेही वाचा : Tomato Farming Success Story : एकरभर फळबागेवर भारी पडले टोमॅटो; वीस गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न घेणारे शिवहार पाटील

Web Title: Farmers should not sell cotton for now; Cotton purchase at CCI centers will remain closed until further orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.