पॉवर टिलर 8 BHP पेक्षा जास्त या घटकासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना पॉवर वीडर घेण्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे.
कृषी आयुक्तालयाचे दि. २५.०१.२०२२ रोजीचे पत्रानुसार ज्या शेतकऱ्यांनी पॉवर टिलर (8 BHP पेक्षा कमी) साठी अर्ज केला असेल व त्यांची निवड झाली असेल केवळ अशा शेतकऱ्यांसाठीच पॉवर वीडर (5 BHP पेक्षा जास्त) खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
क्षेत्रीय स्तरावरून पॉवर टिलर (8 BHP पेक्षा जास्त) या घटकासाठी निवड झालेले शेतकरी पाॅवर वीडर घेण्याबाबत विचारणा करत असल्याने कळविण्यात येते कि, ज्या शेतकऱ्यांची पॉवर टिलर या घटकासाठी निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी पॉवर वीडर घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर लाभार्थ्यांसाठी अनुदानाची परिगणना करताना सन २०२५-२६ चे मार्गदर्शक सूचनांमध्ये पॉवर वीडर घटकासाठी BHP नुसार देण्यात आलेले अनुदान अनुज्ञेय राहील. सदर लाभार्थ्यांकडून पॉवर टिलर ऐवजी पॉवर वीडरचे अनुदान मंजूर असल्याचे हमीपत्र घेण्यात यावे.
अधिक वाचा: कृषी यांत्रिकीकरण योजनेतील १ लाख अनुदानाची मर्यादा काढली; आता असे मिळणार अनुदान