Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > भाजीपाला पिके, शेतीपूरक व्यवसायाच्या तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांनी जाणून घेतली माहिती; नांदगाव कृषी विभागाचा उपक्रम

भाजीपाला पिके, शेतीपूरक व्यवसायाच्या तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांनी जाणून घेतली माहिती; नांदगाव कृषी विभागाचा उपक्रम

Farmers learned modern information about vegetable crops and complementary business technologies; initiative of Nandgaon Agriculture Department | भाजीपाला पिके, शेतीपूरक व्यवसायाच्या तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांनी जाणून घेतली माहिती; नांदगाव कृषी विभागाचा उपक्रम

भाजीपाला पिके, शेतीपूरक व्यवसायाच्या तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांनी जाणून घेतली माहिती; नांदगाव कृषी विभागाचा उपक्रम

नांदगाव तालुका कृषी विभाग आणि आत्मा यांच्या प्रत्यनातून शेतकऱ्यांनी जाणून घेतली आधुनिक शेती. तसेच कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, विविध मॉडेल्स, वाण, सिंचन, कृषि व अन्न प्रक्रिया, लागवडीच्या पद्धती, जैविक तंत्रज्ञान, पीक संरक्षण, पशुसंवर्धन इत्यादी बाबतचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या फुले कृषी महोत्सव २०२६ मध्ये नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवार (दि. १८) रोजी भेट दिली. सदर अभ्यास दौऱ्याचे आयोजन तालुका कृषी अधिकारी रविंद्र डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक अंतर्गत, नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. दौऱ्याचे उद्घाटन नांदुरचे उपसरपंच साहेबराव धिवर यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात एकूण २० शेतकऱ्यांचा सहभाग होता.

ज्यात तालुक्यातील नांदुर, भालुर, वडाळी खु., मळगाव, खिर्डी, बोयेगाव, धनेर या गावांतील शेतकऱ्यांचा सहभाग होता. या दौऱ्यात शेतकऱ्यांना तृणधान्ये, कडधान्य, तेलबिया, चारा पिके, भाजीपाला पिके, फळपिके, फुलपिके इत्यादी विविध वाणांची पिके शेतकऱ्यांना दाखवण्यात आली. प्रक्षेत्र भेटी घेत शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय, दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती, फळपिके नर्सरी, शेडनेट मध्ये भाजीपाला पिके इत्यादी शेतीपूरक व्यवसायाच्या तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच, शेतीपूरक सर्व प्रकारच्या ट्रॅक्टरचलीत औजारे, मशीन्स, काढणीपश्चात तंत्रज्ञान मशिनरी यांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर अभ्यास दौऱ्यात समन्वयक म्हणून आत्माचे एस.टी. कर्नर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, नांदगाव यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

Web Title : नांदगाँव कृषि विभाग की पहल में किसानों ने कृषि प्रौद्योगिकी सीखी।

Web Summary : नांदगाँव के किसानों ने एक कार्यशाला में आधुनिक कृषि तकनीकों और कृषि विश्वविद्यालय की तकनीकों के बारे में सीखा। उन्होंने फसल किस्मों, सिंचाई, प्रसंस्करण और पशुपालन में अंतर्दृष्टि प्राप्त की, जिससे कृषि उन्नति को बढ़ावा मिला।

Web Title : Farmers learn about agriculture technology at Nandgaon agriculture department initiative.

Web Summary : Nandgaon farmers learned modern farming techniques and agricultural university technologies at a workshop. They gained insights into crop varieties, irrigation, processing, and animal husbandry, fostering agricultural advancements.