Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांनो खरिपासाठी डिएपी खत मिळालं नाही तर चिंता करू नका; वापरा ही पर्यायी खते

शेतकऱ्यांनो खरिपासाठी डिएपी खत मिळालं नाही तर चिंता करू नका; वापरा ही पर्यायी खते

Farmers, if you don't get DAP fertilizer for Kharif, don't worry; use these alternative fertilizers | शेतकऱ्यांनो खरिपासाठी डिएपी खत मिळालं नाही तर चिंता करू नका; वापरा ही पर्यायी खते

शेतकऱ्यांनो खरिपासाठी डिएपी खत मिळालं नाही तर चिंता करू नका; वापरा ही पर्यायी खते

महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे.

महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे.

राज्यामध्ये सद्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. डिएपी (Di-Ammonium Phosphate) खता मध्ये १८ टक्के नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत.

डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे.

एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-१६ टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे.

डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे.

एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-१०:२६:२६, एनपीके-२०:२०:०:१३, एनपीके-१२:३२:१६ व एनपीके-१५:१५:१५ या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो.

त्याचबरोबर टिएसपी (Triple Super Phosphate) या खतामध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असुन डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डिएपी खतास उत्तम पर्याय आहे.

चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना करण्यात येत आहे.

अधिक वाचा: Cyclone Shakti: 'शक्ती' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; पुढील तीन दिवस या ठिकाणी जोरदार पाऊस

Web Title: Farmers, if you don't get DAP fertilizer for Kharif, don't worry; use these alternative fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.