Join us

पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची नव्याने बैठक; एकरी किमान सात ते आठ कोटीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 09:56 IST

purandar airport recnet update पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एकरी एक कोटी रुपयांचा दर सांगितला असला, तरी हा दर अपुरा असल्याचे मत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

सासवड : पुरंदरविमानतळ प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एकरी एक कोटी रुपयांचा दर सांगितला असला, तरी हा दर अपुरा असल्याचे मत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

आम्हाला या प्रकल्पामुळे कायमचे विस्थापित व्हावे लागणार आहे. एक कोटी रुपयांत काहीच होणार नाही. एकरी किमान सात ते आठ कोटी रुपये मिळाले, तरच शासनाला संपूर्ण सहकार्य करू, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, खानवडी आणि मुंजवडी या सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प होत आहे.

या गावांतील जमिनींची मोजणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन प्रति एकर एक कोटी रुपये, तसेच विहिरी, झाडे, फळबागा यासाठी दुप्पट दर देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी नाकारला आहे.

वनपुरी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी सांगितले की, २०२३ मध्ये उदाचीवाडी येथे ८० लाख रुपये प्रति एकर असा व्यवहार झाला होता.

शासनाच्या नियमानुसार त्या व्यवहाराच्या पाच पट दराने किमान चार कोटी रुपये एकरी दर व्हायला हवा. तसेच रिंग रोडसाठी शासनाने प्रति गुंठा १४ ते १५ लाख रुपये दिले असून, म्हणजेच एकरी सुमारे सहा कोटी रुपये होतात.

विस्थापन कायमचे; दरही तितकाच मोठा हवारिंग रोडसाठी कोणी कायमचे विस्योहसा ही काही कायम विमानतळासाठी आम्हाला घरे, शेतजमीन, गुरेढोरे आणि उपजीविकेचे सर्व साधन सोडून द्यावे लागणार आहे. त्यामुळे एकरी सात ते आठ कोटी आम्ही भविष्यासाठी स्थिर राहू शकू, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

शासनाला अंतिम इशारा◼️ शेतकऱ्यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पुढील वाटाघाटीस तयार नाही. जिल्हाधिकारी वा मुख्यमंत्री यांच्या बैठकींना हजेरी लावणार नाही.◼️ आवश्यक असल्यास पुन्हा आंदोलन सुरू करू. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.

रिंगरोडसाठी चालतंय मग आम्हाला का नाही?१५ लाख प्रति गुंठा रिंगरोडसाठी प्रशासनाने देऊ केले आहे म्हणजे एकरी सहा कोटी रुपयांचा मोबदला रिंगरोड बाधितांना मिळणार आहे. त्यामुळे कायमचे विस्तापित होणाऱ्यांना एवढा कमी दर नको अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

अधिक वाचा: बिबट्याची दहशत वाढली; ग्रामस्थांवर आली गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers demand higher compensation for Purandar airport project land.

Web Summary : Purandar airport-affected farmers demand ₹7-8 crore per acre, rejecting the offered ₹1 crore. They cite higher rates for ring road land acquisition and the permanent displacement caused by the project, requesting fair compensation.
टॅग्स :विमानतळपुरंदरशेतकरीशेतीपुणेजिल्हाधिकारीमुख्यमंत्रीराज्य सरकारसरकार