नितीन कांबळे
पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे सध्या तरुणांचा मोठ्या प्रमाणावर कल वाढत चालला असल्याचे दिसून येते. कोणी नोकरी सोडून शेतीत नशीब अजमावत आहेत तर कोणी नोकरी सांभाळून उत्तम शेती करत असल्याचे दिसून येते.(Farmer Story)
अशीच आधुनिक शेती केली आहे कासारी येथील शिक्षक पती-पत्नीने. एक एकरात कांदा बियाणाची लागवड (Onion seeds cultivation) करून सहा लाखांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे.
बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील कासारी येथील राजेंद्र भोसले व पत्नी मीनाक्षी भोसले यांनी आपल्या एक एकर शेतात ओतूर येथून उत्तम दर्जाचे कांदा आणून त्याचे कोट तयार करत ४ बाय १ अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करून लागवड (Onion seeds cultivation) करत ठिबकच्या माध्यमातून पाण्याची सोय केली.(Farmer Story)
लागवड, फवारणी, ठिंबक यासह अन्य मजुरी असा एकरी दोन ते सव्वादोन लाख खर्च झाला. आता हे बियाणे काढण्यास सुरुवात होणार असून, गावरान कांदा बियाणे असल्याने किलोला दोन हजारांचा भाव मिळतो किंवा कमी जास्त होतो. (Onion seeds)
एकरात दोन लाख खर्च झाला असला तरी उत्पन्न सहा लाखांच्या घरात मिळणार आहे. ओतूर येथील संतोष मुराबे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत आहे. त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, भोसले दांपत्य सध्या इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू पाहत असल्याचे दिसत आहे. कासारी येथील राजेंद्र भोसले व मीनाक्षी भोसले या दांपत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत अशा प्रकारे कांदा शेती पिकवली आहे.
शाळा सांभाळून शेतात आधुनिक प्रयोग
सकाळी शेतात फेरफटका मारून शाळा सुटल्यानंतर परत शेतात जायचे. ठिबकने पाणी सुरू असते. रविवारी सुटीच्या दिवशी फवारणी करावी लागते. हे सगळे करताना पत्नी मीनाक्षी, आई, भाऊ यांचेदेखील सहकार्य लाभते.
शेती नक्कीच फायदेशीर
शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर शेती कधीच तोट्यात जात नाही. फक्त कष्ट करण्याची जिद्द ठेवली तरी शेती नक्कीच फायदेशीर असल्याचा सल्ला तरुण शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकरी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.