Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Farmer id : ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणीसाठी राज्यात 'हा' जिल्हा प्रथम क्रमांकावर

Farmer id : ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणीसाठी राज्यात 'हा' जिल्हा प्रथम क्रमांकावर

Farmer id: 'This' district ranks first in the state for Agristack Farmer ID registration | Farmer id : ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणीसाठी राज्यात 'हा' जिल्हा प्रथम क्रमांकावर

Farmer id : ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणीसाठी राज्यात 'हा' जिल्हा प्रथम क्रमांकावर

Agristack Farmer id शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'ॲग्रीस्टॅक' नोंदणी बंधनकारक केली आहे.

Agristack Farmer id शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'ॲग्रीस्टॅक' नोंदणी बंधनकारक केली आहे.

Agristack Farmer id शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'ॲग्रीस्टॅक' नोंदणी बंधनकारक केली आहे.

अहिल्यानगर जिल्हा ॲग्रीस्टॅक नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्याची शंभर टक्के नोंदणी होण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये ॲग्रीस्टॅक जनजागृतीसाठी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एका दिवसांत ८ हजार ६१३ शेतकऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधत मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅकवर आपली नोंदणी पूर्ण करावी. तंत्रज्ञानाच्या साहायाने शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणे या उद्देशाने नगर तहसील कार्यालयाने ही मोहीम सुरू केली.

नायब तहसीलदार (महसूल) अभिजित वांढेकर, सहायक महसूल अधिकारी माधवी पुंडे, महसूल सहायक अशोक तांदळे, आकाश कर्पे यांच्या पथकासह सर्व मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक यांनी या मोहिमेत भाग घेतला.

ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केल्यानंतर शासनाने मिळणारे फायदे समजावून सांगण्यात आले. नोंदणी करण्याची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

महसूल विभागाच्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे शेतकऱ्यांनी समाधन व्यक्त केले. संपर्क झालेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याची ग्वाही दिली.

ॲग्रीस्टॅक जनजागृती मोहिमेत नगर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. डिजिटल साक्षरतेच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात गावोगावी शिबिरांचे आयोजन करून शंभर टक्के 'ॲग्रीस्टॅक' नोंदणी केली जाणार आहे. - संजय शिंदे, तहसीलदार, अहिल्यानगर तहसील कार्यालय

अधिक वाचा: राज्यात तूर खरेदीला आता वेग येणार; केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title : एग्रीस्टैक किसान आईडी पंजीकरण में अहिल्यानगर महाराष्ट्र में शीर्ष पर।

Web Summary : एग्रीस्टैक किसान आईडी पंजीकरण में अहिल्यानगर जिला महाराष्ट्र में सबसे ऊपर है। अधिकारी किसानों से राज्य और केंद्रीय योजनाओं तक पहुंचने के लिए सरकारी केंद्रों या मोबाइल ऐप के माध्यम से पंजीकरण करने का आग्रह करते हैं। तहसील कार्यालय सक्रिय रूप से किसानों को पंजीकरण में सहायता कर रहा है।

Web Title : Ahilyanagar tops Maharashtra in Agristack Farmer ID registration.

Web Summary : Ahilyanagar district leads Maharashtra in Agristack Farmer ID registration. Authorities urge farmers to register via government centers or mobile apps to access state and central schemes. The tahsil office is actively assisting farmers with registration.