Lokmat Agro >शेतशिवार > शेतकरी अनिल पाटलांनी क्षारपड जमिनीत घेतले एकरी १०५ टन ऊस उत्पादन

शेतकरी अनिल पाटलांनी क्षारपड जमिनीत घेतले एकरी १०५ टन ऊस उत्पादन

Farmer Anil Patil produces 105 tons of sugarcane per acre in saline soil | शेतकरी अनिल पाटलांनी क्षारपड जमिनीत घेतले एकरी १०५ टन ऊस उत्पादन

शेतकरी अनिल पाटलांनी क्षारपड जमिनीत घेतले एकरी १०५ टन ऊस उत्पादन

मिरज तालुक्यातील समडोळी येथील प्रयोगशील शेतकरी अनिल नरसगोंडा पाटील यांनी क्षारपड जमिनीमधून उसाचे एकरी १०५ टन उत्पादन घेतले आहे.

मिरज तालुक्यातील समडोळी येथील प्रयोगशील शेतकरी अनिल नरसगोंडा पाटील यांनी क्षारपड जमिनीमधून उसाचे एकरी १०५ टन उत्पादन घेतले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

समडोळी : मिरज तालुक्यातील समडोळी येथील प्रयोगशील शेतकरी अनिल नरसगोंडा पाटील यांनी क्षारपड जमिनीमधून उसाचे एकरी १०५ टन उत्पादन घेतले आहे. पाटील यांच्या या यशस्वी प्रयोगाचा अन्य शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.

जुना समडोळी ते सांगलीवाडी रस्त्यावर अनिल पाटील यांचे तीन एकर शेत आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये दि. १ जून २०२३ रोजी ८६०३२ या वाणाच्या उसाची लागण केली.

उसाच्या वाढीनुसार पाचवेळा स्प्रे तर पाचवेळा आळवणी घातली. जमीन सर्वसाधारण क्षारयुक्तसदृश्य जाणवल्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक टप्प्यामध्ये तीन एकर शेतामध्ये सचिद्र निचरा प्रणालीचा वापर करून उसाची लागण केली.

ऊस लागणीपासून साखर कारखान्याला गळीतास जाईपर्यंत आवश्यक ती काळजी घेतली. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक संजीव माने यांनी उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले आहे.

अधिक वाचा: तुमची जमीन क्षारपड झाली आहे? क्षार कमी करण्यासाठी करा या पिकांची लागवड?

Web Title: Farmer Anil Patil produces 105 tons of sugarcane per acre in saline soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.