पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यात द्राक्ष व स्ट्रॉबेरीसाठी १४ तर केळी, मोसंबी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत आहे, अशी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही योजना पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे मार्फत राबविण्यात येत आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी द्राक्ष व स्ट्रॉबेरी पिकासाठी १५ ऑक्टोबर, केळी, मोसंबी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा पिकासाठी ३० नोव्हेंबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर व डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२६ याप्रमाणे अंतिम मुदत राहील.
ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणार आहेत किंवा नाही.
असे आहे योजनेचे स्वरूप◼️ योजनेबाबत घोषणापत्र आवश्यक राहील. योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी अधिसूचित फळबागांचे प्रतिशेतकरी कमीत कमी २० गुंठे व जास्तीत जास्त ४ हेक्टर इतके उत्पादनक्षम क्षेत्र असणे आवश्यक आहे.◼️ सहभागासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी, आधार, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, फळबागेचा जिओ टॅगिंग फोटो, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार, ई-पीक पाहणी आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठीमाहितीसाठी जवळील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक वाचा: तुकडेबंदीखालील रखडलेले जमिनीचे व्यवहार होणार सुलभ; कुणाला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर
Web Summary : Farmers are invited to participate in the Fruit Crop Insurance Scheme for crops like banana, orange, papaya, mango, and pomegranate. Application deadlines vary, with October 31st being the last date for banana, mosambi, and papaya. The scheme is optional for all farmers.
Web Summary : किसानों को केला, संतरा, पपीता, आम और अनार जैसी फसलों के लिए फल फसल बीमा योजना में भाग लेने के लिए आमंत्रित किया जाता है। आवेदन की अंतिम तिथियाँ अलग-अलग हैं, केला, मोसंबी और पपीता के लिए 31 अक्टूबर अंतिम तिथि है। यह योजना सभी किसानों के लिए वैकल्पिक है।