Join us

आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणासाठी कृती दलाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 6:55 PM

कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे.

कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०५.०९.२०२३ रोजी सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल येथे संपन्न झालेल्या बैठकीत 'आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी संशोधन करुन उपाययोजना सूचविण्यासाठी मा. मंत्री (कृषि) यांनी तात्काळ बैठक आयोजित करुन टास्क फोर्स स्थापन करावा' असे मा. मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते. त्यानुसार आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणाकरीता खालीलप्रमाणे कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात येत आहे.

संशोधक संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीअध्यक्ष
विभाग प्रमुख, कृषि कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीसदस्य
सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीसदस्य
सहयोगी प्राध्यापक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीसदस्य
सहाय्यक प्राध्यापक, कृषि कीटकनाशक विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीसदस्य
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरीसदस्य
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्गसदस्य
विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग, ठाणेसदस्य सचिव

उपरोक्त कृती दलाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या प्रभावी नियंत्रणाकरीता संशोधन करुन उपाययोजना कराव्यात. असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :आंबाकोकणशेतकरीपाऊसरत्नागिरीसिंधुदुर्गकीड व रोग नियंत्रणफलोत्पादन