लाल भोपळा हे एक वेलवर्गीय फळ आहे. त्याच्या पानांची तसेच फळाची भाजी बनवली जाते. त्याचबरोबर भोपळ्याची खीर आणि पराठे बनविले जातात.
भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे फळ गोलाकार असते. यात खूप बिया असतात. फळाचे वजन ४ ते ८ किलोपर्यंत असू शकते.
सर्वांत मोठी प्रजाती मैक्सिमाचे वजन ३४ किलोपेक्षा जास्त असते. हे संपूर्ण जगात लावले जाते. मोठ्या आजारानंतर शरीर कमजोर झाले असल्यास आहारात भोपळा घेतला पाहिजे. काही दिवसांनी थकवा दूर होतो.
भोपळा हृदय रोगींसाठी खूप फायदेशीर आहे. तो कोलेस्ट्रॉल कमी करतो. भोपळा उष्णता कमी करणारा आणि लघवीला उत्तेजन देणारा आहे. तसेच पोटाच्या समस्या दूर करतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. भोपळ्याला आरोग्यवर्धक मानले जाते. भोपळ्यामध्ये बीटा कॅरोटीन असते, ज्यामुळे व्हिटॅमिन-ए मिळते. पिवळ्या आणि केशरी रंगाच्या भोपळ्यामध्ये कॅरोटिनचे प्रमाण जास्त असते.
भोपळ्याच्या बिया आयर्न, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहेत. जगभरात भोपळ्याचा उपयोग केला जातो, म्हणून २९ सप्टेंबरला 'पम्पकिन डे' साजरा केला जातो.
आरोग्यासाठी प्रमुख फायदे१) हृदयासाठी चांगला- कोलेस्ट्रॉल कमी ठेवतो आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.- त्यातील पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात.२) वजन नियंत्रणासाठी उपयोगी- लाल भोपळा कमी कॅलरी व उच्च फायबरयुक्त आहे.- लवकर पोट भरल्यासारखे वाटते आणि अति खाणे टाळते.३) पचन सुधारतो- त्यातील नैसर्गिक फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.४) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर- व्हिटॅमिन C, E आणि बीटा-कॅरोटीनमुळे त्वचा उजळते व केस निरोगी राहतात.- फ्री-रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण होते.५) मधुमेह नियंत्रणात मदत- त्यातील फायबर रक्तातील साखर स्थिर ठेवते.- नियमित सेवन केल्यास इन्सुलिनचे कार्य सुधारते.१०० ग्रॅम लाल भोपळ्यातील पोषक घटक (Nutritional Value)
घटक (Nutrients) | प्रमाण (Per 100g) | आरोग्यदायी भूमिका |
---|---|---|
ऊर्जा (Calories) | ~26 kcal | कमी कॅलरी, वजन नियंत्रणासाठी उत्तम. |
पाणी (Water) | ~91 g | शरीराला हायड्रेशन देते. |
प्रथिने (Protein) | ~1 g | स्नायूंसाठी आवश्यक. |
चरबी (Fat) | ~0.1 g | अत्यल्प चरबी, हृदयासाठी चांगले. |
कार्बोहायड्रेट (Carbohydrates) | ~6.5 g | ऊर्जा पुरवते. |
फायबर (Dietary Fiber) | ~0.5–1 g | पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम. |
व्हिटॅमिन A (Beta-carotene) | ~8500 µg | दृष्टी सुधारते, त्वचेसाठी उपयुक्त. |
व्हिटॅमिन C | ~9 mg | रोगप्रतिकारशक्ती वाढवते. |
व्हिटॅमिन E | ~1.0 mg | त्वचेचे आरोग्य राखते. |
पोटॅशियम (Potassium) | ~340 mg | रक्तदाब नियंत्रित ठेवतो. |
मॅग्नेशियम (Magnesium) | ~12 mg | हाडे व स्नायूंसाठी महत्त्वाचे. |
फॉस्फरस (Phosphorus) | ~44 mg | हाडे मजबूत करतो. |
झिंक (Zinc) | ~0.3 mg | रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त. |
अधिक वाचा: आता खरेदीखतापूर्वीच जमिनीची हद्द कायम होणार; काय आहे निर्णय? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Pumpkin benefits heart health, manages blood sugar, and aids weight control. Rich in vitamins, fiber, and antioxidants, it supports digestion, skin health, and overall well-being. A nutritional powerhouse for a healthy lifestyle.
Web Summary : कद्दू हृदय स्वास्थ्य के लिए फायदेमंद है, रक्त शर्करा को नियंत्रित करता है और वजन नियंत्रण में मदद करता है। विटामिन, फाइबर और एंटीऑक्सिडेंट से भरपूर, यह पाचन, त्वचा के स्वास्थ्य और समग्र कल्याण का समर्थन करता है। स्वस्थ जीवन शैली के लिए एक पोषण शक्ति।