Lokmat Agro >शेतशिवार > e Pik Pahani : ई-पीक पाहणीचे नवीन अपडेटेड मोबाईल अ‍ॅप वापरून कशी कराल पिकांची नोंद?

e Pik Pahani : ई-पीक पाहणीचे नवीन अपडेटेड मोबाईल अ‍ॅप वापरून कशी कराल पिकांची नोंद?

e Pik Pahani : How to record crops using the newly updated mobile app of e-Pik Pahani? | e Pik Pahani : ई-पीक पाहणीचे नवीन अपडेटेड मोबाईल अ‍ॅप वापरून कशी कराल पिकांची नोंद?

e Pik Pahani : ई-पीक पाहणीचे नवीन अपडेटेड मोबाईल अ‍ॅप वापरून कशी कराल पिकांची नोंद?

e pik pahani app भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्याासाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) या मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

e pik pahani app भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्याासाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) या मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्याासाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) या मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शेतकरी स्तरावरील ही नोंदणी एक ऑगस्टपासून भरण्यास सुरुवात केली असून अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. आपल्या शेतातील उभ्या पिकांची नोंद स्वतः ७/१२ वर करा, आपल्याच बांधावरून प्रत्यक्षात ई-पीक पाहणी करता येते.

ई-पीक पाहणी करण्याची पद्धत
◼️ गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.
◼️ होम पेजवर पिकाची माहिती नोंदवा.
◼️ खाते क्रमांक निवडा
◼️ भूमापन क्र./गट क्र. निवडा
◼️ जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शविला जाईल.
◼️ पोट खराबा क्षेत्र दर्शविला जाईल.
◼️ हंगाम निवडा.
◼️ पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र (हे. आर)
◼️ पिकाचा वर्ग निवडा. (एक पीक असेल तर निर्भेळ पिक निवडा किंवा एका पेक्षा जास्त पिकासाठी बहुपिक निवडा.)
◼️ पिकाचा प्रकार.
◼️ पिकांची/झाडांची नावे निवडा.
◼️ क्षेत्र भरा.
◼️ जलसिंचनाचे साधन निवडा.
◼️ सिंचन पध्दत निवडा.
◼️ लागवडीचा दिनांक भरा.
◼️ पुढे जा यावर क्लिक करा.
◼️ फोटो काढा. (आपल्या शेतात उभे राहून पिकांचे दोन फोटो काढा)
◼️ माहितीची पुष्टी करा.
◼️ स्वयंघोषणा पत्रावर टिक करा.
◼️ सबमिट करा.
(आपण नेटवर्क मध्ये असल्यास माहिती अपलोड होईल, नेटवर्क मध्ये नसल्यास होमपेज वरील अपलोड बटन दाबून माहिती अपलोड करा.)

अधिक वाचा: e Pik Pahani : पीक पाहणी झाली आता सोपी; मोबाईल अ‍ॅपमध्ये केले 'हे' बदल, वाचा सविस्तर

Web Title: e Pik Pahani : How to record crops using the newly updated mobile app of e-Pik Pahani?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.