Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > 'सगुणा'च्या दर्जेदार भातपिकामुळे लावणीची भातशेती कालबाह्य?

'सगुणा'च्या दर्जेदार भातपिकामुळे लावणीची भातशेती कालबाह्य?

Due to the quality rice crop of 'Saguna', plantation rice farming is outdated? | 'सगुणा'च्या दर्जेदार भातपिकामुळे लावणीची भातशेती कालबाह्य?

'सगुणा'च्या दर्जेदार भातपिकामुळे लावणीची भातशेती कालबाह्य?

अधिक मेहनत, मजुरांची जुळवाजुळव आदींमुळे जिल्ह्यातील भातशेतीपासून दुरावत असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या 'सगुणा भात पेरणीची पद्धत अल्प खर्च कमी मेहनत आणि अधिक उत्पादनाच्या दृष्टीने भातपीक दर्जेदार व जोमाने वाढत आहे.

अधिक मेहनत, मजुरांची जुळवाजुळव आदींमुळे जिल्ह्यातील भातशेतीपासून दुरावत असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या 'सगुणा भात पेरणीची पद्धत अल्प खर्च कमी मेहनत आणि अधिक उत्पादनाच्या दृष्टीने भातपीक दर्जेदार व जोमाने वाढत आहे.

ठाणे जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने चिखलणी करून रोपांच्या लावणीची भातशेती शेतकऱ्यांना खर्चिक आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्नही कमी असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. अधिक मेहनत, मजुरांची जुळवाजुळव आदींमुळे जिल्ह्यातील भातशेतीपासून दुरावत असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या 'सगुणा भात पेरणीची पद्धत अल्प खर्च कमी मेहनत आणि अधिक उत्पादनाच्या दृष्टीने भातपीक दर्जेदार व जोमाने वाढत आहे. लागवड केलेले भातरोप आजपर्यंतही जमिनीशी एकरूप झाले नाही. काही ठिकाणी लागवडीही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धत कालबाह्य ठरण्याचे चिन्ह आहेत.

वाढत्या महागाईने बी-बियाणे, खते, फवारणी औषधींच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यात रोगराई आणि अवकाळी पावसाचा तडाख्यात पीक सापडताच हातचे पीक जाऊन शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. विविध समस्या, खर्च आणि अवकाळी पावसाआधी भाताचे पीक घरात येणाऱ्या 'सगुणा राईस टेक्निक' म्हणजे 'एसआरटी' पद्धतीची भात पेरणी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांच्या या पद्धतीच्या भाताचे पीक लागवणीच्या भातापेक्षा कितीतरी पटींनी दर्जेदार व जोरदार बहरले असून, वाढीव उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्याचे -जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी स्पष्ट केले.

या 'एसआरटी' भात पेरणीमुळे शेतकऱ्यांना २० वर्षे शेत नांगरण्याची गरज नाही. पारंपरिक पद्धतीप्रमाणे चिखलणी करण्याची गरज नाही. याशिवाय कमी मेहनतीत, कमी खर्चात कमी पावसात अधिक भात उत्पादन या 'एसआरटी'च्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा दुजोरा कुटे यांनी दिला आहे.

अंबरनाथ, शहापुरात प्रयोग
- भात पेरणीच्या वेळीच खताचा वापर करावा लागणाऱ्या या पद्धतीने शेतजमिनीचा कसदारपणा टिकून राहतो. रोगराई, किडीचा प्रादुर्भाव नाही. खर्चाची आणि मेहनतीची बचत झाल्याचे सूतोवाच शेतकऱ्यांनी केले.
- अंबरनाथ तालुक्यातील कुडेरान गाव परिसरात शेतकऱ्यांनी एसआरटी'च्या भाताचे संवर्धन सुरु केले आहे. याप्रमाणे शहापूर येथील अष्ठे येथील शेतकरी बबन करण, मुकुंद करण, मौजे भावसे येथील संजय भोये आदी शेतकऱ्यांच्या शेतातील या भात पिकाचा दर्जा उत्तम आहे. 
- यंदा पीक कीड रोगमुक्त असून, शेत हिरवेगार झाले आहे. जमीन कायमस्वरूपी अधिक सुपीक होण्यासाठी प्रयोग केले जात आहेत.
 

Web Title: Due to the quality rice crop of 'Saguna', plantation rice farming is outdated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.