खजूर प्रामुख्याने सौदी अरेबिया, इराण, इराक, संयुक्त अरब अमिरात, उत्तर आफ्रिकेतील इजिप्त, अल्जेरिया, ट्यूनिशिया येथे पीक घेतले जाते.
हे फळ पिकण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी कोरडे आणि उबदार हवामान महत्त्वाचे असते. दक्षिण युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांमध्येही खजूर लागवड केली जाते.
खजूर Dates हे अतिशय पौष्टिक फळ आहे. त्यामध्ये भरपूर ऊर्जा, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे नैसर्गिक गोडवा देणारे फळ आहे. नवरात्रोत्सवाच्या उपवासाच्या काळात खजूर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.
खजुराचे प्रकारअजवा, मेदजूल, सफावी, मबरूम, सुगई, खालस, डेग्लेट नूर इ.
खजूर खाण्याचे फायदे१) ऊर्जा मिळविण्यास मदतखजूरमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रक्टोज, सुक्रोज) असते जी शरीराला झटपट ऊर्जा देते.२) पचनशक्ती सुधारतेखजूरमध्ये भरपूर प्रमाणात तंतूमय पदार्थ (फायबर) असल्याने पचन सुधारते व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.३) रक्तशुद्धी व हिमोग्लोबिन वाढवतेखजूरमध्ये लोह (Iron) असल्याने रक्ताची कमतरता (अॅनिमिया) दूर करण्यास मदत होते.४) हाडे व दात मजबूत होतातकॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस खजूरमध्ये असल्याने हाडे मजबूत राहतात.५) हृदयासाठी लाभदायकखजूरमध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब संतुलित ठेवण्यास व हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.६) मेंदूची कार्यक्षमता सुधारतेखजूरमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे मेंदूचे आरोग्य टिकवून ठेवण्यात फायदा होतो.७) गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी उपयोगीखजूरमध्ये पोषक घटक असल्यामुळे गर्भवती महिलांना व नवमातांना ऊर्जा मिळते.८) त्वचा व केसांसाठी फायदेशीरविटामिन सी व डी असल्यामुळे त्वचेची लवचिकता व केसांची ताकद टिकून राहते.९) रक्तातील साखर संतुलित ठेवतेउपवास तोडताना खजूर खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते, अचानक वाढत नाही.१०) शरीरातील पाणी संतुलित ठेवतेखजूरमध्ये पोटॅशियम असते, जे शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवते.
अधिक वाचा: संगिता ताईंनी बाराशे रुपयांच्या कर्जातून सुरू केलेला सुकामेवा व्यवसाय आज करतोय २५ लाखांची उलाढाल
Web Summary : Dates are nutritious fruits rich in energy, vitamins, and minerals. They aid digestion, boost iron, strengthen bones, and improve heart and brain health. Beneficial for pregnant women, skin, and blood sugar.
Web Summary : खजूर ऊर्जा, विटामिन और खनिजों से भरपूर पौष्टिक फल हैं। वे पाचन में सहायता करते हैं, आयरन बढ़ाते हैं, हड्डियों को मजबूत करते हैं, और हृदय और मस्तिष्क के स्वास्थ्य में सुधार करते हैं। गर्भवती महिलाओं, त्वचा और रक्त शर्करा के लिए फायदेमंद।