Join us

मूळव्याध व पोटांच्या विकारांवर अत्यंत गुणकारी 'ही' रानभाजी तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:07 IST

Ranbhaji Kuda ह्या वनस्पतीच्या विविध औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदिक आणि पारंपरिक औषध पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

'कुडा' ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. जी स्थानिक पातळीवर 'पांढराकुडा' म्हणून ओळखली जाते. तिच्या विविध औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदिक आणि पारंपरिक औषध पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

कुड्याची फुले पांढरी शुभ्र असून, ती आकर्षक दिसतात. या झाडाला लांब शेंगा येतात, ज्या जोडीने वाढतात. कुड्याच्या सालीचा उपयोग त्वचा विकारांवर होतो.

'कुटजारिष्ट' हे प्रसिद्ध औषध कुड्याच्या सालीपासून बनवले जाते. कुड्याची मुळे, साल, आणि बिया मूळव्याध, रक्तस्रावयुक्त मूळव्याध आणि अतिसारासारख्या पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहेत.

कुड्याच्या सालीचा वापर विविध त्वचा विकारांच्या उपचारात होतो. कुड्याच्या बियांचे चूर्ण नियमितपणे घेतल्यास अन्न पचन सुधारते आणि पोटात वायू धरत नाही, ज्यामुळे पोटासंबंधी समस्या कमी होतात.

कुड्याची पाने शक्तीवर्धक असून, स्नायूंचे दुखणे कमी करण्यास मदत करतात. थोडक्यात, कुडा ही एक बहुउपयोगी औषधी वनस्पती आहे.

ती विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापरली जाते. तथापि, कोणत्याही औषधी वनस्पतीचा वापर करण्यापूर्वी योग्य वैहाकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अधिक वाचा: PM Kisan Hapta : तुम्हाला 'पीएम किसान'चा हप्ता आला नाही; काय असू शकतात कारणे?

टॅग्स :भाज्याजंगलऔषधंआरोग्यहेल्थ टिप्स