lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकरीपुत्रांनो सैन्यात जायचेय? कोणकोणती पदे आहेत आणि कसा कराल ऑनलाइन अर्ज

शेतकरीपुत्रांनो सैन्यात जायचेय? कोणकोणती पदे आहेत आणि कसा कराल ऑनलाइन अर्ज

Do farmer sons want to join the army? What are the posts and how to apply online | शेतकरीपुत्रांनो सैन्यात जायचेय? कोणकोणती पदे आहेत आणि कसा कराल ऑनलाइन अर्ज

शेतकरीपुत्रांनो सैन्यात जायचेय? कोणकोणती पदे आहेत आणि कसा कराल ऑनलाइन अर्ज

भारतीय लष्कराने अग्निवीर आणि नियमित सैन्यभरतीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली असून, यासाठी महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांसह दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय लष्कराने अग्निवीर आणि नियमित सैन्यभरतीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली असून, यासाठी महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांसह दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भारतीय लष्कराने अग्निवीर आणि नियमित सैन्यभरतीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली असून, यासाठी महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांसह दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेदरम्यान खेळाडू, एनसीसी प्रमाणपत्रधारक, आयटीआय आणि पदविकाधारकांना अतिरिक्त गुण दिले जातील. उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यात फसवणूक करणाऱ्यांना बळी न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईतील सैनिक भरती कार्यालयाने अग्निवीर निवड चाचणीसाठी केवळ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांत कायमचे वास्तव्य असणारे अविवाहित उमेदवार पात्र ठरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नोंदणीच्या वेळी अर्जदाराच्या डिजिलॉकर खात्यातून वैयक्तिक तपशील प्राप्त केला जाणार आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी २५० रुपये परीक्षा शुल्क रुपये भरावे लागणार आहेत.

कोणकोणती पदे आणि पात्रता?
१) अग्निवीर जनरल ड्युटी: ४५ टक्के गुणांसह दहावी आणि प्रत्येक विषयात ३३ गुण आवश्यक, दहावीमध्ये सी ग्रेड, ग्रेडिंग सिस्टीम असल्यास प्रत्येक विषयात डी ग्रेड, लाइट मोटर व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्यांना ड्रायव्हर पदासाठी प्राधान्य, उंची १६८ सेंटीमीटर असणे गरजेचे.
२) टेक्निकल : बारावीत ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. दहावीत ५० टक्के गुणांसह मान्यताप्राप्त आयटीआयमधून २ वर्षाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि पॉलिटेक्निकमधून २ किवा ३ वर्षाचा डिप्लोमा.
३) ट्रेड्समन : प्रत्येक विषयात ३३ टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उंची १६८ सेंटीमीटर असणे गरजेचे.
४) लिपिक/स्टोअर कीपर : इंटरमिजिएट परीक्षा कोणत्याही विषयात ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान ५० टक्के गुण आणि इंग्रजी आणि गणित/अकाउंट्स/बुक किपिंग अतिरिक्त ५० टक्के गुण, बारावी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उंची १६२ सेंटीमीटर असणे गरजेचे.

आठवी, दहावी पास आणि आयटीआय झालेल्यांनाही संधी
प्रत्येक विषयात ३३ टक्के गुणांसह ८ वी उत्तीर्ण झालेल्यांनाही संधी देण्यात येणार आहे. त्यांची उंची १६८ सेंमी असणे गरजेचे आहे.

निवडीचे दोन टप्पे
१) ऑनलाइन लेखी परीक्षा : पहिला टप्पा ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा असणार आहे.
२) प्रत्यक्ष भरती : दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि निकष भरती प्रक्रिया असणार आहे.

संपूर्ण माहिती या वेबसाइटवर
लष्कराच्या www. joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी विभागात हिंदी आणि इंग्रजीमध्ये नोंदणी करता येणार आहे. तसेच याच वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळणार आहे.

अर्ज कसा कराल?
प्रत्यक्ष भरती सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे. त्याच्या होम पेजवर, JCO/OR/Agniveer Apply च्या लिकवर किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगिन करावे. त्यानंतर अग्निवीर लॉगिन पेज उघडेल, यानंतर नोंदणी लिंकवर, आता फॉर्म भरण्याची पुढील प्रक्रिया सुरू करा. शेवटी, फी ऑनलाइन भरा. फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट घ्या.

Web Title: Do farmer sons want to join the army? What are the posts and how to apply online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.