Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > जिल्हाबाहेर खत विक्री केल्यास परवानाधारकांवर कारवाई करण्याचे 'या' जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हाबाहेर खत विक्री केल्यास परवानाधारकांवर कारवाई करण्याचे 'या' जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

District Magistrate orders action against licensees for selling fertilizer outside the district | जिल्हाबाहेर खत विक्री केल्यास परवानाधारकांवर कारवाई करण्याचे 'या' जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हाबाहेर खत विक्री केल्यास परवानाधारकांवर कारवाई करण्याचे 'या' जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

खतांचा साठा उपलब्ध झाल्यानंतर अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री होत असल्याने स्थानिक पातळीवर खतांचा तुटवडा निर्माण होतो, ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगाव जिल्ह्यातील साठा शेजारच्या जिल्ह्यात विक्रीला मनाई केली आहे.

खतांचा साठा उपलब्ध झाल्यानंतर अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री होत असल्याने स्थानिक पातळीवर खतांचा तुटवडा निर्माण होतो, ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगाव जिल्ह्यातील साठा शेजारच्या जिल्ह्यात विक्रीला मनाई केली आहे.

खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित खतांच्या साठ्याची मागणी नोंदविली जाते. मात्र, खतांचा साठा उपलब्ध झाल्यानंतर अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री होत असल्याने स्थानिक पातळीवर खतांचा तुटवडा निर्माण होतो, ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगाव जिल्ह्यातील साठा शेजारच्या जिल्ह्यात विक्रीला मनाई केली आहे.

परवानाधारकांनी शेजारच्या जिल्ह्यातील विक्रेत्यांना खतांचा साठा विक्री केल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित परवानाधारकांवर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. विदर्भातील बुलडाणा, मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्याची सीमा जळगाव जिल्ह्याला लागून आहे.

त्यामुळे गतकाळात सीमाभागातल्या काही विक्रेत्यांनी शेजारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांसह खतांची विक्री केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. याची दखल घेऊन हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

नियंत्रण कक्ष कार्यान्वित

• कृषी विभागाने खतांसह बियाण्यांचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि काळाबाजार रोखण्यासाठी आता जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. शेतकऱ्यांसह परवानाधारकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा कक्ष सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सेवेत असेल.

• जळगाव जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अविनाश खैरनार व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्याशी संपर्क साधून बियाणे, खत, किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संदर्भात तक्रार नोंदविता येणार आहे.

• तसेच saojalgaon@gmail.com व zpjalgaonado@gmail.com वर देखील तक्रार दाखल करता येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिली आहे.

दि.६ मे रोजी उपलब्ध खतांचा साठा (मे.टन).

कंपनीगोडाऊनघाऊक विक्रेतेकिरकोळ विक्रेते
युरिया २८०.८२५ ३३९१.३८५ ३७७७३.९०८
डीएपी१३.७५० ३४८.५०० ५८४९.२५० 
एमओपी१३०.६५० १४९७.२६० ५६१९.४१४ 
एसएसपी१७५७.८५० ५९७८.९५५ ४१९१३.२४४ 
कंपोस्ट४२.००० २४.२५० ०० 
एफओएम०० १०.००० ५१.०९० 

आधारकार्डची सक्ती

• वितरणात पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी शेतकऱ्यांच्या आधारकार्डाच्या आधारावरच बियाणे, खत, किटकनाशकांची विक्री करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. आधार कार्डच्या सक्तीमुळे आता बाह्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घुसखोरीला पायबंद बसणार आहे.

• जळगाव जिल्ह्यात खतांसह बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जळगावसाठी उपलब्ध झालेला साठा अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विक्री न करण्याचे निर्देश दिले आहेत.

• शेजारच्या जिल्ह्यांमध्ये खतांसह बियाण्यांची विक्री केल्याचे उघड झाल्यास संबंधित परवानाधारकांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी अपेक्षित असलेल्या साठ्याची मागणी आपण नोंदविली आहे. या साठ्याचे वितरण करताना आधारकार्डची सक्ती केली असून बाह्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिल्यास स्थानिक पातळीवर तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला आलेला साठा स्थानिक शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या सूचना केल्या आहेत. - रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव .

हेही वाचा : पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड; विक्रमी उत्पादन घेत फायद्याची शेती करणारे सुधारकराव 

Web Title : जिले से बाहर खाद बेचने पर विक्रेताओं पर कार्रवाई: कलेक्टर का आदेश।

Web Summary : जलगाँव कलेक्टर ने स्थानीय कमी को रोकने के लिए जिले के बाहर खाद की बिक्री पर रोक लगाई। उल्लंघन करने पर लाइसेंस रद्द किए जाएंगे। खाद और बीज आपूर्ति के बारे में शिकायतों के लिए एक नियंत्रण कक्ष सक्रिय है, अनिवार्य आधार सत्यापन के माध्यम से पारदर्शिता सुनिश्चित की जा रही है।

Web Title : Action against fertilizer sellers for out-of-district sales: Collector's order.

Web Summary : Jalgaon Collector prohibits fertilizer sales outside the district to prevent local shortages. Licenses will be revoked for violations. A control room is active for complaints regarding fertilizer and seed supply, ensuring transparency through mandatory Aadhaar verification.