Lokmat Agro >शेतशिवार > Jasminum Insect Discovery : मोगऱ्यावर आक्रमण करणाऱ्या किडीच्या प्रजातीचा शोध! भारतीय शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन

Jasminum Insect Discovery : मोगऱ्यावर आक्रमण करणाऱ्या किडीच्या प्रजातीचा शोध! भारतीय शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन

Discovery of an insect species that attacks mogra Important research by Indian scientists | Jasminum Insect Discovery : मोगऱ्यावर आक्रमण करणाऱ्या किडीच्या प्रजातीचा शोध! भारतीय शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन

Jasminum Insect Discovery : मोगऱ्यावर आक्रमण करणाऱ्या किडीच्या प्रजातीचा शोध! भारतीय शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन

डॉ. डी. एम. फिरके यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने हे संशोधन केले असून या प्रजातीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुष्पविज्ञान अनुसंधान संचालनालय या संस्थेचे नाव देण्यात आले आहे.

डॉ. डी. एम. फिरके यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने हे संशोधन केले असून या प्रजातीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुष्पविज्ञान अनुसंधान संचालनालय या संस्थेचे नाव देण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Pune : पुण्यातील DFR म्हणजेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुष्पविज्ञान अनुसंधान संचालनालयाने मोगऱ्यावरील एका किडीच्या प्रजातीचा शोध लावला असून या नव्या प्रजातीला संस्थेचे नाव देण्यात आले आहे. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. डी. एम. फिरके यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने मोगरा (Jasminum sambac) फुलांच्या कळ्यांवर आक्रमण करणाऱ्या मिजमाशीची (blossom midge) एक नवी प्रजाती शोधून काढली आहे. 

या नव्या प्रजातीचे नाव Contarinia icardiflores sp. nov. असून, ‘icardiflores’ हे नाव ‘Indian Council of Agricultural Research- Directorate of Floricultural Research (ICAR-DFR) या संस्थेच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. नवीन शोधलेल्या किडीच्या प्रजातीला संस्थेचे नाव देणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.

दरम्यान, Contarinia वंशातील मिजमाशी जगभरातील शोभेच्या तसेच खाद्य पिकांसाठी गंभीर कीड मानल्या जातात. नव्याने सापडलेली C. icardiflores ही प्रजाती मोगऱ्याच्या लागवडीत प्रचंड नुकसान करत असल्याचे आढळले. ही कीड दिसायला Contarinia maculipennis Felt या पूर्वी ज्ञात एकमेव मोगऱ्यावर आढळणाऱ्या प्रजातीसारखी असली तरी अनुवांशिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळी आहे.

असे केले संशोधन
या प्रजातीचे ओळख पटवण्यासाठी संशोधकांनी आकार वैशिष्ट्यांबरोबरच आण्विक तंत्रज्ञानाचा (molecular tools) वापर करून ‘इंटिग्रेटिव्ह टॅक्सोनॉमी’चा अवलंब केला. मादीच्या फ्लॅगेलोमियर्स (flagellomeres), सेर्सी (cerci) तसेच नराच्या अ‍ॅडियागस (aedeagus) रचनेतील वैशिष्ट्ये ही ओळखण्यासाठी महत्त्वाची ठरली. जलद व अचूक निदानासाठी Mitochondrial cytochrome oxidase subunit I (COI) जीनचा अंशिक क्रम (partial sequence) मिळवण्यात आला.

C. icardiflores ही कीड १६ ते २१ दिवसांत जीवनचक्र पूर्ण करते आणि मोगरा उत्पादनासाठी गंभीर धोका निर्माण करते. या शोधामुळे मिजमाशीची माहितीचा भक्कम पाया तयार होऊन मोगरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नव्या संशोधनासाठी आणि कीड व्यवस्थापन तंत्रे विकसित करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Discovery of an insect species that attacks mogra Important research by Indian scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.