कोल्हापूर : असळज (ता. गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ चे पेमेंट जमा केले आहे.
१६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या पंधरवड्यात गाळप केलेल्या ४७ हजार २४८ टन उसाचे प्रतिटन ३४५० रुपयांप्रमाणे बिल देण्यात आले आहे.
सदर ऊस बिलाची रक्कम १६ कोटी ३० लाख ५ हजार संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.
कारखान्याने २०२५-२६ च्या गाळप हंगामात ४ लाख ७ हजार ४७२ टन उसाचे गाळप करून ३ लाख ८४ हजार ६५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.
याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा: मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला सोमेश्वरकडून २०० रुपये अनुदान; टनाला एकूण किती रुपये मिळणार?
Web Summary : D. Y. Patil Sugar Factory, Asalaj, cleared sugarcane payments from January 16-31, 2026. Farmers received ₹3450 per ton, totaling ₹16.30 crore, directly deposited into their accounts. The factory crushed 4,07,472 tons of sugarcane, producing 3,84,650 quintals of sugar.
Web Summary : डी. वाय. पाटिल चीनी कारखाने, असळज ने 16-31 जनवरी, 2026 तक गन्ना भुगतान किया। किसानों को ₹3450 प्रति टन मिला, कुल ₹16.30 करोड़ सीधे उनके खातों में जमा किए गए। कारखाने ने 4,07,472 टन गन्ने की पेराई कर 3,84,650 क्विंटल चीनी का उत्पादन किया।