Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र ठरतंय फायदेशीर

शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र ठरतंय फायदेशीर

Crop cover technique is beneficial for producing exportable pomegranates | शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र ठरतंय फायदेशीर

शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र ठरतंय फायदेशीर

संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील प्रगतशील शेतकरी तानाजी नाथा गाडेकर यांनी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे.

संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील प्रगतशील शेतकरी तानाजी नाथा गाडेकर यांनी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील प्रगतशील शेतकरी तानाजी नाथा गाडेकर यांनी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे.

काढणीच्या काळात वाढत असलेली उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून संपूर्ण बागेला क्रॉप कव्हरचे आच्छादन दिले आहे. संपूर्ण बाग पांढरीशुभ्र दिसत आहे.

हे क्रॉप कव्हर डाळिंब पिकाला नवसंजीवनी ठरत आहे. गाडेकर हे गेली ४० वर्षापासून शेती व्यवसाय करतात. त्यांनी शेतीत अनेक नवनवीन प्रयोग राबवत उच्चांकी उत्पन्न मिळविले आहे.

गाडेकर यांनी १ जुलै २०२३ रोजी साडे सहा एकर क्षेत्रात डाळिंब पिकाची चार पद्धतीत ३ हजार ३०० रोपांची लागवड केली. दोन वर्षात आता एका झाडाला सुमारे १०० फळे लागलेली आहेत.

असे केले व्यवस्थापन
-
संपूर्ण बागेची स्टीलचे पाइपद्वारे बांधणी.
- एकरी १० ते १५ ट्रक शेणखताचा वापर.
- शेतीचा सेंद्रिय कर्ब २.५८ आहे.
- गुजरात येथून क्रॉप कव्हर खरेदी केला.
- संपूर्ण बागेवर क्रॉप कव्हर टाकला.
- ३ लाख रुपयांचा क्रॉप कव्हर आणि मजुरी ५० हजार.

रोग प्रतिरोधक वातावरण
-
क्रॉप कव्हरमुळे उन्हाची तीव्रता रोखली जात असल्याने पाण्याची धूप कमी होत असून तेल्या रोगासाठी प्रतिरोधक वातावरण बनत आहे.
- शिवाय हवेतून येणारी धूळ व जीवजंतू यांचा फळाशी संपर्क रोखला जात असल्याने फळाची गुणवत्ता वाढत असल्याचे गाडेकर यांचे म्हणणे आहे.
- ड्रीप, शेणखत, रोपे, स्टील, तार, क्रॉप कव्हर यांसह मजुरी यासाठी आजपर्यंत सुमारे ६० ते ७० लाखांचा खर्च झाल्याचे गाडेकर यांनी सांगितले.

डाळिंब सेंद्रिय पद्धतीने पिकवले आहेत. बाहेर देशात निर्यात करण्यासाठी वरील पद्धतीने डाळिंब बागेची काळजी घेतली आहे. दोन महिन्यांत डाळिंब विक्रीसाठी येतील. चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. - प्रतीक गाडेकर

अधिक वाचा: डाळिंब पिक संरक्षणासाठी अॅन्टी हेलनेट कव्हरला मिळतंय अनुदान वाचा सविस्तर

Web Title: Crop cover technique is beneficial for producing exportable pomegranates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.