पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ग्रीन क्रेडिट योजनेतच भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढे आली आहे. मिश्र वृक्षारोपण संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या चेन लिंक कुंपण कामात वनपरिक्षेत्राधिकारी नवेगावबांध संबंधित अभियंता व कंत्राटदार यांच्या संगनमताने आर्थिक लालसेपोटी जाणीवपूर्वक निकृष्ट बांधकाम करून मोठ्या प्रमाणावर केल्याचा भ्रष्टाचार आरोप तक्रारदार विजय डोये यांनी केला आहे.
नवेगावबांध (जि.गोंदिया) वनपरिक्षेत्राअंतर्गत बाराभटी राऊंड, चान्ना बीट, मौजा इंजोरी येथील कम्पार्टमेंट क्रमांक ७१९ (८.०० हेक्टर) मध्ये सुमारे १८०० मीटर लांबीचे कुंपण उभारण्यात आले असून यासाठी रु. ३१.१० लाख खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात काम पाहता हिरव्या योजनेला काळी झळ लावल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
पायाभरणी केवळ नावापुरती १.५ मीटर खोल पायाभरणीची तरतूद असताना अनेक ठिकाणी पूर्ण खोदकामच न करता वरवर दगड टाकून काम उरकण्यात आले. यामुळे कुंपण टिकणार की कोसळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एमएस अँगल पोस्टवर देणे बंधनकारक असलेले दोन थरांचे वॉटरप्रूफ पेंट अनेक ठिकाणी दिलेलेच नाही. परिणामी कुंपण गंजाच्या विळख्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्य मापाच्या चेन लिंक जाळीऐवजी वेगळ्या जाडीची जाळी वापरून साहित्यामध्ये
मानक तपशिलांना हरताळ
• रेड बुकनुसार आवश्यक असलेले एमएस अँगल पोस्ट, स्ट्रट्स, टीएमटी बार यांची गुणवत्ता तपासणी न करता वापर करण्यात आला. अभियंता व वनाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप आहे.
• संपूर्ण प्रकल्प पाहता प्रत्यक्ष काम निकृष्ट असताना कागदोपत्री मात्र काम पूर्ण दाखविण्यात आल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून नियोजित आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
• फेरफार करण्यात आला. खर्च कमी बिल मोठे, असा सरळसरळ गणिताचा खेळ येथे दिसून येतो.
प्रशासन गप्प का?
ग्रीन क्रेडिटसारख्या पर्यावरण रक्षणाच्या योजनेतच जर संगनमताने भ्रष्टाचार होत असेल, तर इतर योजनांची काय अवस्था असेल, असा थेट सवाल हा प्रकार बघितल्यानंतर उपस्थित होत आहे. या प्रकारा घेऊन नवेगावबांध वनपरिक्षेत्राधिकारी, संबंधित अभियंता व कंत्राटदार यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
काम पूर्ण झाले असले तरी कामात अनियमितता असल्यास ते पूर्ण करण्यात येईल. अंतिम बिल काढायचे शिल्लक आहे. या कामाची अनामत रक्कम सुद्धा विभागाकडे असल्याने अंदाजपत्रकानुसारच काम पूर्ण करण्यात येईल. - सदाशिव अवगान, नवेगावबांध वनपरिक्षेत्र अधिकारी.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
