Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > पुनर्वसन जमिनींचे वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर; तहसीलदारांनी सुरु केला 'हा' नवा उपक्रम

पुनर्वसन जमिनींचे वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर; तहसीलदारांनी सुरु केला 'हा' नवा उपक्रम

Conversion of rehabilitation lands from Class-2 to Class-1; Tehsildars started 'this' new initiative | पुनर्वसन जमिनींचे वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर; तहसीलदारांनी सुरु केला 'हा' नवा उपक्रम

पुनर्वसन जमिनींचे वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर; तहसीलदारांनी सुरु केला 'हा' नवा उपक्रम

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तहसील कार्यालयात पुनर्वसन जमिनींचे 'भोगवटादार वर्ग-२' मधून 'भोगवटादार वर्ग-१' मध्ये रूपांतर करण्यासाठी शिबीर आयोजित केले होते.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तहसील कार्यालयात पुनर्वसन जमिनींचे 'भोगवटादार वर्ग-२' मधून 'भोगवटादार वर्ग-१' मध्ये रूपांतर करण्यासाठी शिबीर आयोजित केले होते.

अहिल्यानगर : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तहसील कार्यालयात पुनर्वसन जमिनींचे 'भोगवटादार वर्ग-२' मधून 'भोगवटादार वर्ग-१' मध्ये रूपांतर करण्यासाठी शिबीर आयोजित केले होते.

या विशेष शिबिरास पहिल्या दिवशी १३८ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाची ५०० अर्जाची तयारी असून, हे विशेष शिबिर रविवारीही सुरू होते.

पुनर्वसन मिळालेल्या अंतर्गत 'भोगवटादार वर्ग-२' मधून जमिनी 'वर्ग-१' मध्ये रूपांतरित करणे, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जागेवरच सोडवणे.

महसूल वसुलीस गती देणे या उद्देशाने नेवासा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शासकीय प्रक्रियेतील क्लिष्टता कमी करून शेतकऱ्यांना जलद सेवा देण्यासाठी प्रशासनाने ही विशेष मोहीम आखली आहे.

पहिल्या दिवशी या शिबिरासाठी तहसील कार्यालयात एकाच वेळी ५०० अर्जदारांचे काम हाताळता येईल, अशी सक्षम यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

जमिनीचा वर्ग बदलण्याची प्रक्रिया सुलभ व जलद करण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. पुनर्वसन जमिनीधारक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात उपस्थित राहून या मोहिमेचा लाभ घ्यावा. - सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी, नेवासा

अधिक वाचा: सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा आता घरपोच मिळणार; भूमी अभिलेख विभागाचा 'हा' नवा प्रयोग

Web Title : नेवासा में भूमि रूपांतरण शिविर, वर्ग-2 से वर्ग-1 में बदलाव आसान

Web Summary : नेवासा प्रशासन ने पुनर्वास भूमि को वर्ग-2 से वर्ग-1 में बदलने के लिए शिविर आयोजित किया। पहले दिन 138 किसानों ने भाग लिया। उद्देश्य प्रक्रिया को सरल बनाना, किसानों की समस्याओं का त्वरित समाधान और राजस्व संग्रह में तेजी लाना है। एक साथ 500 आवेदन संभाले जा सकते हैं।

Web Title : Nevasa starts camp for land conversion from Class-2 to Class-1

Web Summary : Nevasa administration organizes camp to convert rehabilitation land from Class-2 to Class-1. 138 farmers responded on day one. The initiative aims to simplify the process and resolve farmer issues quickly, speeding up revenue collection. 500 applications can be handled simultaneously.