lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > दूध देणाऱ्या गायी, म्हशी म्हणजे शेतकऱ्यांसाठी 'एटीएम'

दूध देणाऱ्या गायी, म्हशी म्हणजे शेतकऱ्यांसाठी 'एटीएम'

college of agriculture dairy national conference on smart dairy farming Cow buffalo is ATM for farmers | दूध देणाऱ्या गायी, म्हशी म्हणजे शेतकऱ्यांसाठी 'एटीएम'

दूध देणाऱ्या गायी, म्हशी म्हणजे शेतकऱ्यांसाठी 'एटीएम'

कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये दुग्धव्यवसायाचे महत्त्व सांगण्यात आले

कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये दुग्धव्यवसायाचे महत्त्व सांगण्यात आले

शेअर :

Join us
Join usNext

शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायामधील येणाऱ्या काळातील आव्हाने, तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढीसाठी करण्यात येणाऱ्या विविध प्रयोग आणि संशोधनावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडण्यासाठी इंडियन डेअरी असोसिएशन, पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने अद्ययावत व शाश्वत दुग्ध व्यवसाय या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरनामे सभागृहात घेण्यात आली होती.

 यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील बोलत होते. या वेळी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी, बायफचे अध्यक्ष डॉ. बी. के. काकडे, आणंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्णेय, इंडियन डेअरी असोसिएशनचे (पश्चिम विभाग) चेअरमन डॉ. जे. बी. प्रजापती, कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, माफसूचे मा. कुलगुरू डॉ. एन. व्ही. पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासाळकर, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, विभाग प्रमुख डॉ. धीरज कणखरे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले की, देशातील दुग्धोत्पादन जवळपास २३१ मिलियन टन म्हणजेच जागतिक उत्पादनाच्या २३ टक्के आहे. मागील आठ वर्षात दूध उत्पादनात ५० टक्के वाढ झालेली असून त्यामध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, पशुसंवर्धन विषयाशी संबंधित संशोधन संस्था आणि विद्यापीठे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचा वाटा ५ % आहे. या व्यवसायामुळे पशुवैद्यकीय सेवा, यांत्रिकीकरण, दुग्ध प्रक्रिया उद्योग, स्वयंचलित यंत्रे, डिजिटलायझेशन इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या देशी गोवंश व प्रशिक्षण केंद्रामार्फत देशातील वेगवेगळ्या देशी पशुधनाच्या शेण आणि मलमुत्राचे शास्त्रीय संशोधन केले जात आहे. यामध्ये विदेशीच्या गोवंशाच्या तुलनेत देशी गोवंशाच्या शेण व मलमुत्रांमध्ये सुक्ष्म जीवांची संख्या अधिक पटीने वाढलेली दिसून आली आहे. जमीनीच्या पोषक आरोग्याच्यादृष्टीने ही बाब महत्वाची आहे.

शेतकऱ्यांच्या दूध देणाऱ्या गाई ह्या शेतकऱ्यांचे एटीएम आहेत की ज्या शेतकऱ्यांना सातत्याने आर्थिक उपलब्धी करत असतात. ऐतिहासिक दाखला देत त्यांनी मानवी आहारातील दूध, दही, लोणी, तूप पदार्थांचे महत्त्व विशद करत देशातील पहिली पशु गणना सन १९१९ ला झाल्याचे नमूद केले. तसेच देशाच्या दुग्ध व्यवसायाच्या पायाभरणीमध्ये श्री वल्लभभाई पटेल, त्रिभुवनदास पटेल वर्गीस कुरियन यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवणे ही काळाची गरज आहे सध्या दुधाचा दरडोई वापर ४२७ ग्रॅम प्रतिदिन आहे, त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेता दुग्ध उत्पादनात वाढ करावी लागेल. सध्या देशामध्ये दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. शासकीय स्तरावर दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सन २०४७ विकसित भारत साकारात असताना देशाची लोकसंख्या १६६ करोड पर्यंत पोहोचणार आहे आणि त्यासाठी जवळपास ४२५ मिलियन टन दुग्धोत्पादनाची गरज लागणार आहे. येत्या काळात दुग्धोत्पादनाच्या दृष्टिकोनातून गाईच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे त्याअनुषंगाने प्रजनन क्षमता विकसित करण्याचे तंत्रज्ञान यावरही भर द्यावा लागणार आहे.

इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी यांनी नमूद केले की, गेल्या काही वर्षात शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोरोना काळानंतर ग्राहकांच्या मानसिकतेत प्रथिनेयुक्त आहाराकडे कल वाढलेला दिसून येतो. त्यामुळे गावपातळीवर असलेल्या दुधाच्या बॅण्डवर ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर दुधाची शाश्वत उत्पादकता आणि गुणवत्ता टिकवणे गरजेचे आहे. भविष्यात शाश्वततेच्या दृष्टीने शेतकरी आणि ग्राहक हे दोघेही समाधानी राहिले तरच दुधाची दुधाची शाश्वतता टिकून राहिल. यात प्रामुख्याने गुणवत्ता, नैसर्गिक पोषण मुलद्रव्ये, ग्राहकांना मिळणारा दर हे महत्वाचे आहे. याशिवाय उपलब्ध असलेल्या जवळपास २५ टक्के पशुधनाचा शेतक-यांना उपयोग नाही. हे पशुधन शाश्वत दुध उत्पादकतेच्या दृष्टीने उपयोगात आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, दुधाची साठवणूक, दुध प्रक्रिया, चांगला चारा, दर्जेदार विर्यमात्रा, कृत्रिम रेतन या बाबीवर भर देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. पाटील यांनी आपल्या मनोगतात देशांतील उपलब्ध असणाऱ्या संधी आणि निर्माण होणारी आव्हाने यांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज आहे. उत्पादनाच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये लक्ष घालून दुग्ध उत्पादकता वाढविण्यासाठी चाऱ्याचे व्यवस्थापन, पुरवठा साखळी व आय ओ टी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. गीर, साहिवाल, थारपारकर या देशी गोवंशाच्या जनुकीय वाढीसाठी चाऱ्याची गुणवत्ता, योग्य खुराक याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

डॉ. जे. बी. प्रजापती यांनी त्याच्या स्वागतपर भाषणात भारतीय लोक शाश्वत शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करतात. जेणेकरून दुग्ध व्यवसायाची सर्वांगीण प्रगती होत आहे. लहान शेतकरी ३ ते ५ जनावरे पाळून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. जनावराच्या जाती मध्ये विकास करणे गरजेचे असून त्यामुळे दुधाची उत्पादकता वाढणार आहे. प्रत्येक पाच वर्षांनी दुग्धव्यवसायात बदल होत असून विद्यार्थ्यांनी शाश्वत शेती साठी भविष्यात दुग्धव्यवसाय जबाबदारीने करणे गरजेचे आहे. बायफचे अध्यक्ष डॉ. काकडे यांनी नमूद केले की, दुधाची उत्पादकता वाठविणेसाठी पुरवठा साखळी निर्माण होणे गरजेचे आहे. संकरीत प्रजनन व चारा उत्पादन, माहितीचे व्यवस्थापन करणेची आवश्यकता आहे.

आणंद कृषी विद्यापीठ, गुजरातचे माजी कुलगुरू डॉ. एम. सी वार्णेय, मागील पंधरा वर्षात दुधाचे १५ टक्केने उत्पादन वाढले आहे. येत्या २०२७ पर्यत दुधाच्या उत्पादनात मोठी वाढ होणार असून त्यातून तीस लाख कोटीपर्यत उलाढाल वाढणार आहे. देशातील दुग्धोत्पादनामध्ये महाराष्ट्र सहाव्या नंबरवर असून राजस्थान व उत्तरप्रदेशचा क्रमांक अनुक्रमे प्रथम व द्वितीय लागतो.

अमूल डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित व्यास यांनी दुग्ध व्यवसाय यामध्ये झालेले औद्योगीकरण व भविष्यातील संधी या विषयी सादरीकरण केले. या परिषदेच्या निमित्याने दुग्ध व्यवसाय विषयक प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच भित्तीपत्रकाचे (पोस्टर) सादरीकरण करण्यात आले. यावेळी परिषदेत इंडियन डेअरी असोसिएशन पुणेच्या सदस्य रिची अग्रवाल यांनी सुत्रसंचालन केले. देशी गाई संशोधन व प्रशिक्षणाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे यांनी आभार व्यक्त केले.

Web Title: college of agriculture dairy national conference on smart dairy farming Cow buffalo is ATM for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.