Lokmat Agro >शेतशिवार > कृष्णेच्या काठावरील चव्हाण बंधूंनी गांडूळ खत निर्मितीतून शेती केली समृद्ध; काढत आहेत लाखोंचा नफा

कृष्णेच्या काठावरील चव्हाण बंधूंनी गांडूळ खत निर्मितीतून शेती केली समृद्ध; काढत आहेत लाखोंचा नफा

Chavan brothers on the banks of Krishna have made their farming prosperous through vermicompost production; They are making a profit of lakhs | कृष्णेच्या काठावरील चव्हाण बंधूंनी गांडूळ खत निर्मितीतून शेती केली समृद्ध; काढत आहेत लाखोंचा नफा

कृष्णेच्या काठावरील चव्हाण बंधूंनी गांडूळ खत निर्मितीतून शेती केली समृद्ध; काढत आहेत लाखोंचा नफा

शेतीला जोडधंदा म्हणून कोपर्डे हवेली येथील शेतकरी दादासाहेब चव्हाण आणि युवराज चव्हाण हे दोन बंधू देशी गाईंच्या पालनाला गांडूळ प्रकल्पाची जोड देऊन स्वतःच्या शेतीची गरज भागवत आहेत.

शेतीला जोडधंदा म्हणून कोपर्डे हवेली येथील शेतकरी दादासाहेब चव्हाण आणि युवराज चव्हाण हे दोन बंधू देशी गाईंच्या पालनाला गांडूळ प्रकल्पाची जोड देऊन स्वतःच्या शेतीची गरज भागवत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

कोपर्डे हवेली : शेतीला जोडधंदा म्हणून कोपर्डे हवेली येथील शेतकरी दादासाहेब चव्हाण आणि युवराज चव्हाण हे दोन बंधू देशी गाईंच्या पालनाला गांडूळ प्रकल्पाची जोड देऊन स्वतःच्या शेतीची गरज भागवत आहेत.

त्याचबरोबर ते गांडूळ खताची विक्रीही करत आहेत. यातून वर्षाला लाखो रुपये मिळवत आहेत. तसेच हा प्रकल्प पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह शेती अधिकारी, विद्यार्थीही भेट देऊ लागले आहेत.

कोपर्डे हवेली येथील वसंतराव चव्हाण यांनी देशी गायींचे पालन सुरू केले. त्यांची दादासाहेब आणि युवराज या दोन मुलांनी हा व्यवसाय सुरू ठेवत शेती व्यवसायात वाढ केली.

चव्हाण बंधूकडे लहान-मोठ्या गायींची संख्या २५ आहे. त्यांच्या शेणापासून गांडूळ खत तयार होते. गायींच्या दूध, तुपाची आणि गोमूत्राची विक्री होते. गायीच्या खुराकासाठी शेतातील मका पिकाचा भरडा तयार केला जातो.

शेतातच हा व्यवसाय असल्याने संपूर्ण शेती गांडूळ खतावर केली आहे. त्यांच्याकडे दहा मजूर काम करत आहेत. चव्हाण बंधू आले, टोमॅटो, काकडी, ऊस आदी पिके घेत असल्याने त्यांची शेती फायदेशीर ठरत आहेत.

पारंपरिक शेती हा विषय संपत चालला आहे. अनेक पूरक व्यवसाय उभारता येतात. शेतीचे उद्योग एका छताखाली आणून आमचे बंधू दादासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत वसंतराव मास्तर फार्महाऊस स्थापन करून शेती करत आहे. शेती फायदेशीर ठरत आहे. - युवराज चव्हाण, शेतकरी, कोपर्डे हवेली

अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Chavan brothers on the banks of Krishna have made their farming prosperous through vermicompost production; They are making a profit of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.