गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दम घेतल्याने शिराळा तालुक्यात तीन दिवसांपासून उघडीप आहे. मात्र, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे.
त्यामुळे चांदोली धरण ८१.१६ टक्के भरले असून, सध्या धरणातून ४५०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दि. ८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता वक्राकार दरवाज्यातून विसर्ग सुरू करण्यात आला.
धरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३६०६ क्युसेकवर आली आहे, तर विसर्ग ४५०० क्युसेकने सुरू असल्याने धरणातील साठ्यात थोडी घट झाली आहे. यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीतही घट झाली आहे.
प्रमुख धरणांतील पाणीसाठाधरण - क्षमता (टीएमसी) - साठाराधानगरी - ८.३४ - ६.८५तुळशी - ३.४१ - २.७७वारणा - ३४.३९ - २७.९२दूधगंगा - २५.३९ - १७.६७कासारी - २.७७ - १.९७कडवी - २.५३ - २.२७कुंभी - २.७१ - २.०४पाटगाव - ३.७१६ - ३.३५कोयना - १०५.२५ - ७३.५६धोम - १३.५० - १०.००कण्हेर - १०.१० - ७.६२उरमोडी - ९.९६ - ७.२२तारळी - ५.८५ - ४.९५बलकवडी - ४.०८ - २.२४
अधिक वाचा: हंगामाच्या शेवटीच उतारा निश्चित होणार मग कायद्यानुसार चौदा दिवसांत एफआरपी द्यायची कशी?