lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > केंद्राच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात, मराठवाड्यातील या चार जिल्ह्यांचा समावेश

केंद्राच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात, मराठवाड्यातील या चार जिल्ह्यांचा समावेश

Center's drought monitoring tour begins, covering these four districts of Marathwada | केंद्राच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात, मराठवाड्यातील या चार जिल्ह्यांचा समावेश

केंद्राच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात, मराठवाड्यातील या चार जिल्ह्यांचा समावेश

पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदतीबाबत घोषणा होण्याची शक्यता

पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदतीबाबत घोषणा होण्याची शक्यता

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणीसाठी १२ सदस्यांचे केंद्रीय पथक मराठवाड्यात दाखल झाले आहे. आजपासून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यात हा दौरा केला जाणार आहे. आज आणि उद्या मराठवाडयात व त्यानंतर पुणे, सोलापूर, नाशिक, नंदूरबार आणि जळगावात हे पथक पाहणीसाठी जाणार आहे. केंद्र सरकारच्या चार तुकड्या हा पाहणी दौरा करणार आहेत. पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदतीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊसमान झालेल्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यात २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर पुन्हा १७८ तालुक्यांतील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामुळे राज्यात एकूण २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या पथकांकडून पाहणी करण्यात येते. 

राज्य सरकारचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या पथकाकडूनही पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकांमध्ये कृषी विभागाच्या प्रतिनिधींचा महत्त्वाचा सहभाग असून पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण, पशुसंवर्धन, जलजीवन मिशन, रोजगार हमी अग्रणी बँक, सीडब्ल्यूपीआरएस तसेच नागपूरच्या सुदूर संवेदन केंद्राच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. हे सर्व प्रतिनिधी मंगळवारी राज्यातील परिस्थितीचा आढावा पुण्यात विभागीय आयुक्तालयात घेणार आहेत. त्यानंतर विभागनिहाय प्रतिनिधी पाहणी करता जाणार आहेत. 

Web Title: Center's drought monitoring tour begins, covering these four districts of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.