lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > रावण : मराठवाड्यातील सर्वांत मोठा वळू

रावण : मराठवाड्यातील सर्वांत मोठा वळू

biggest bull in Marathwada lal kandhari cow veriety ajay jadhav farmer nanded | रावण : मराठवाड्यातील सर्वांत मोठा वळू

रावण : मराठवाड्यातील सर्वांत मोठा वळू

मराठवाड्यातील सर्वांत मोठा वळू असलेला 'रावण' या प्रदर्शनामध्ये दाखल झाला होता. 

मराठवाड्यातील सर्वांत मोठा वळू असलेला 'रावण' या प्रदर्शनामध्ये दाखल झाला होता. 

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : पुण्यातील मोशी येथे भव्य देशी वंश पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातून विविध प्रकारचे घोडे, बैल, गायी, म्हशी, वळू, बोकड प्रदर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला ज्या बैलजोडीला मान मिळाला ती बैलजोडी प्रमुख आकर्षण ठरली. विशेष म्हणजे मराठवाड्यातील सर्वांत मोठा वळू असलेला 'रावण' या प्रदर्शनामध्ये दाखल झाला होता. 

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील अजय विश्वनाथ जाधव यांचा हा लाल कंधारी जातीचा वळू असून त्याची उंची ६ फूट २ इंच इतकी आहे. त्याचबरोबर या वळूचे एक टन वजन असून तो मराठवाड्यातील सर्वांत मोठा वळू / बैल म्हणून प्रसिद्ध आहे. रावण असे त्याचे नाव असून तो तीन वर्षे वयाचा आहे. त्याने आत्तापर्यंत १४ ठिकाणी झालेल्या बैलांच्या प्रदर्शनामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. 

दूधदरप्रश्नी तोडगा नाहीच! शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात बांधल्या गाई
 

'रावण'चा खुराक
पिळदार शरीर, डौलदार चाल असणारे वळू किंवा बैल संभाळायचे असतील तर प्राण्यांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांच्या आरोग्याची आणि खुराकाकडे नीट लक्ष द्यावे लागते. 'रावण'च्या खुराकासाठी जाधव यांनी विशेष सोय केली आहे. सकाळी तीन ते चार किलो सरकी ढेप, तेवढीच गव्हाची ढेप, सकाळी तीन लीटर आणि सायंकाळी तीन लीटर दूध असा 'रावण'चा खुराक आहे. त्याचा फक्त ब्रिडींगसाठी (लागवडीसाठी) वापर केला जातो.

https://www.instagram.com/reel/C0L5yNjNLm5/

'रावण'ने पटकावलेले बक्षीसे

  • कलंबर जि.नांदेड (प्रथम क्रमांक) -
  • पेठवडज जि. नांदेड (प्रथम क्रमांक) - गांव - परळी जि.बिड (महाराष्ट्र चॅम्पीयन)
  • दिग्रस जि.नांदेड (प्रथम क्रमांक)
  • मावळ जि.पुणे (महाराष्ट्र चॅम्पीयन)
  • देवणी जि.लातूर (प्रथम क्रमांक)
  • भिमा कृषि प्रदर्शन कोल्हापूर (व्दितीय क्रमांक)
  • गेवराई जि.बिड (प्रथम क्रमांक)
  • कनेरीमठ जि.कोल्हापूर (प्रथम क्रमांक)
  • सिध्देश्वर यात्रा, लातूर (निकाल राखीव)
  • जालना (प्रथम क्रमांक)
  • पुणे (मोशी प्रदर्शन - प्रथम क्रमांक)


लाल कंधारी ही प्रजात मूळ कंधार येथील असून आमच्याकडेही या जणावरांचा वापर शेतीच्या कामासाठी  केला जातो. हा वळू एक वर्षाचा असल्यापासून त्याला आम्ही स्पर्धेत उतरवले आहे. त्याने मागच्या दोन वर्षांत १४ वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या आरोग्याची आणि खुराकाची विशेष काळजी घेतली जाते.
- अजय विश्वनाथ जाधव (पशुमालक, शेतकरी)

Web Title: biggest bull in Marathwada lal kandhari cow veriety ajay jadhav farmer nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.