lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > पाणीटंचाईमुळे अवैध उपसा रोखण्यासाठी जलाशयांवर भरारी पथके तैनात

पाणीटंचाईमुळे अवैध उपसा रोखण्यासाठी जलाशयांवर भरारी पथके तैनात

Bharari teams deployed at reservoirs to prevent illegal pumping due to water scarcity | पाणीटंचाईमुळे अवैध उपसा रोखण्यासाठी जलाशयांवर भरारी पथके तैनात

पाणीटंचाईमुळे अवैध उपसा रोखण्यासाठी जलाशयांवर भरारी पथके तैनात

जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा रोखण्यासाठी भरारी पथके कारवाई करत आहेत.

जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा रोखण्यासाठी भरारी पथके कारवाई करत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

लातूर जिल्ह्यातील जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा होणार होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी येथे दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थिती होती.

जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक यांची पथके गठीत करण्यात आली आहेत.

पाण्याचा वापर काटकसरीने करावा...

जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून पिण्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे. त्यामुळे कोणीही पाण्याचा अवैध पद्धतीने उपसा करू नये. तसेच संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे.

या पथकांनी गतिमान कार्यवाही करून जिल्ह्यात होणारा अवैध पाणी उपसा रोखावा, अशा सूचना जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी केल्या. उपलब्ध पाणीसाठा, चारा, तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांचाही जिल्हाधिकारी श्रीमती
ठाकूर-घुगे यांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाण्याबाबत सूचना केल्या.

जलाशयावर भरारी पथकामार्फत कारवाई

• जलाशयांमध्ये आरक्षित करण्यात आलेल्या पाणीसाठ्याचा उपसा करणाऱ्यांवर भरारी पथकांमार्फत कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत ८६ विद्युतपंप जप्त करण्यात आले आहेत.

• १३८ विद्युत स्टार्टर, १०९ वायर बंडल जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८७५ वीज कनेक्शन तोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Web Title: Bharari teams deployed at reservoirs to prevent illegal pumping due to water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.