Lokmat Agro >शेतशिवार > बागेचे नुकसान टाळण्यासाठी होतंय मधमाश्यांचे संगोपन; वाचा काय सांगताहेत उत्पादक शेतकरी

बागेचे नुकसान टाळण्यासाठी होतंय मधमाश्यांचे संगोपन; वाचा काय सांगताहेत उत्पादक शेतकरी

Bees are being raised to prevent damage to gardens; Read what productive farmers are saying | बागेचे नुकसान टाळण्यासाठी होतंय मधमाश्यांचे संगोपन; वाचा काय सांगताहेत उत्पादक शेतकरी

बागेचे नुकसान टाळण्यासाठी होतंय मधमाश्यांचे संगोपन; वाचा काय सांगताहेत उत्पादक शेतकरी

मधमाशा फुलांभोवती रुंजी घालतात. एका फुलावरून दुसन्या फुलावर गेल्याने परागीभवन होते. यातून नर मादी यांचे संगोपन झाल्याने डाळिंबचा बाग चांगला, तसेच तजेलदार येत असल्यामुळे बागेत मधमाशांचे संगोपन केले जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नितीन गमे

मधमाशा फुलांभोवती रुंजी घालतात. एका फुलावरून दुसन्या फुलावर गेल्याने परागीभवन होते. यातून नर मादी यांचे संगोपन झाल्याने डाळिंबचा बाग चांगला, तसेच तजेलदार येत असल्यामुळे बागेत मधमाशांचे संगोपन केले जात आहे.

याच अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्याच्या केलवड (ता. राहाता) येथील शेतकरी शरद गमे यांनी आपल्या बागेत मधमाश्यांचे संगोपन केले आहे. त्यासाठी त्यांनी चार मधपेट्या आपल्या अडीच एकर बागेत बसविल्या आहेत. तसेच मधमाश्यांसाठी पाण्याचे नियोजनही केले आहे.

प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकरी शरद गमे.
प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकरी शरद गमे.

गमे यांनी आपल्या शेतात हा पर्यावरण पूरक उपक्रम राबविला असून २०२४ मध्ये गमे यांनी डाळिंब बागेतून १२ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. कीटकनाशकांच्या फवारणीने मधमाशाचा मृत्यू होतो बागेत परागीकरण होत नसल्याने फुले गळून जातात. तथापि बागेचे नुकसान टाळण्यासाठी मधमाशा संगोपन केले जात असल्याचे गमे सांगतात.

डाळिंब बागेत जास्त उत्पन्न घेण्यासाठी बागेत मधमाशा संगोपन करणे गरजेचे असते, कीटकनाशक फवारणी करताना काही चुका झाल्यास डाळिंब बागेला जोपासणाऱ्या मधमाशा मरून जातात, त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. - शरद गमे, डाळिंब उत्पादक, केलवड.

हेही वाचा :  पिकाचे योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत हिवरखेडच्या प्रशांतरावांनी घेतले टरबूजचे विक्रमी उत्पादन

Web Title: Bees are being raised to prevent damage to gardens; Read what productive farmers are saying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.