Join us
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला मिळाले विमा कवच; मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात ७० लाखांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 16:05 IST

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने ७० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. अपघात होऊन मृत्यू अथवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ३५ शेतकरी कुटुंबीयांना कृषी विभागाच्या वतीने ७० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. अपघात होऊन मृत्यू अथवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना शेतीत काम करताना होणारे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास अथवा त्यांना अपंगत्व आल्यास, त्यांच्या कुटुंबाला किंवा अपंग शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी कार्यरत आहे.

यात २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४२ प्रस्ताव पात्र ठरले होते. यासाठी कृषी विभागाने शासनाकडे ८४ लाखांची मागणी केली होती. मात्र, शासनाकडून ७० लाखांचाच निधी प्राप्त झाला. हा निधी ३५ शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

१४ लाखांच्या निधीची आवश्यकता

कृषी विभागाकडे आलेल्या एकूण ४२ प्रस्तावांपैकी ३५ प्रकरणांत ७० लाखांची मदत करण्यात आली आहे, तर अजून ७प्रस्तावांसाठी १४ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.

अशी आहे योजना

या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये कुटुंबीयांना अर्थसाहाय्य मिळते. अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये मदत दिली जाते.

घरी बसूनच करता येणार अर्ज

पोर्टलवर आणण्यात आली आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया महाडीबीटी त्यामुळे घरी बसून किंवा जवळच्या कोणत्याही सेवा केंद्रातून अर्ज करता येतो.

कोणत्या बाबीसाठी मिळते मदत ?

• शेतात काम करताना शेतकऱ्याचा अपघात झाल्यास किंवा रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच शेतामध्ये यंत्रांमुळे झालेले अपघात. पाण्यात बुडून झालेला मृत्यू, शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने झालेला मृत्यू.

• विंचूदंशातून होणारा मृत्यू विजेचा धक्का लागून झालेला मृत्यू, पूर, वीज कोसळणे, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला मृत्यू आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब

English
हिंदी सारांश
Web Title : Insurance Coverage for Farmers: 7 Million Distributed in Marathwada

Web Summary : Hingoli's 35 farmer families received ₹70 lakh under Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme. Financial aid supports families after farm accidents, death, or disability. Online applications ease access to compensation for various incidents, including accidents and natural disasters, offering up to ₹2 lakh for death or disability.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसरकारकृषी योजनाहिंगोलीमराठवाडाविदर्भ