अवसरी : दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफ.आर.पी. रु. ३०७९.१२ येत आहे.
प्रथम अॅडव्हान्स रु. २८००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. २८०/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर (दि. ५ मे) वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार हंगामाकरीता देय एफ.आर.पी. रु. ३०७९.१२ प्रती मे.टन येत आहे.
कारखान्याने हंगामात गाळप केलेल्या ऊसास प्रथम अॅडव्हान्स रु. २८००/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम अदा केलेली आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याने एकूण ११ लाख ३८ हजार ४९६ मे.टन ऊस गाळप केले आहे.
उर्वरित एफ.आर.पी. रु.२८०/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम रु. ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार सोमवार (दि. ५ मे) रोजी वर्ग करण्यात आली.
कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.
अधिक वाचा: दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर