Lokmat Agro >शेतशिवार > मुरबाड तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये अनुदान देण्यास मंजुरी

मुरबाड तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये अनुदान देण्यास मंजुरी

Approval to provide subsidy of Rs. 700 per quintal to paddy farmers in Murbad taluka | मुरबाड तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये अनुदान देण्यास मंजुरी

मुरबाड तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये अनुदान देण्यास मंजुरी

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना धानासाठीची प्रोत्साहनपर ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना धानासाठीची प्रोत्साहनपर ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

शेअर :

Join us
Join usNext

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना धानासाठीची प्रोत्साहनपर ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

राज्य शासनाकडून पणन हंगाम २०२०-२१ करीता प्रोत्साहनपर रक्कम प्रत्यक्ष धान्य खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी मंजूर केली होती.

मुरबाड तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांची नोंदणी खरीप हंगामातील आहे. मात्र, खरेदीच्या नोंदी प्रत्यक्षात रब्बी हंगामात झालेल्या होत्या.

मात्र त्यावेळी ऑनलाईन नोंदणी करताना सर्व्हरमधील अडचणींमुळे खरेदी प्रक्रियेत अडचणी आल्या होत्या.

त्याचबरोबर त्यावेळी कोरोना काळ असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर धान आणण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी पूर्ण झाली नव्हती.

त्यामुळे आता ५०० शेतकऱ्यांच्या एकूण ११ हजार ३८७.५६ क्विंटलच्या धानासाठी प्रति क्विंटल सातशे रुपये दराने अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली.

अधिक वाचा: Pik Karj : शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार? वाचा सविस्तर

Web Title: Approval to provide subsidy of Rs. 700 per quintal to paddy farmers in Murbad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.