Pune : महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या केंद्राचे “अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र” असे नामकरण होणार आहे.
देशभरातली महत्त्वाच्या देशी गायींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, सुधारणा आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या केंद्राच्या बळकटीकरणालाही यापूर्वी शासनाने मान्यता दिली होती.
“दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून नाविन्यपुर्ण अशा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. देशी गायींच्या मौल्यवान व दुर्मिळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्त्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात या केंद्रास त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्यात आली“ असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “देशी गायींचे संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य शासन सक्षमपणे काम करत आहे. पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आल्याने या कार्याला आणखी नवी ओळख आणि बळ मिळेल."
Web Summary : The Pune native cow research center will be named after Deputy Chief Minister Ajit Pawar. The center focuses on conservation, research, and improvement of native cow breeds, aiming to boost milk production and guide farmers in sustainable agriculture. This honors Pawar's contribution.
Web Summary : पुणे देशी गाय अनुसंधान केंद्र का नाम उपमुख्यमंत्री अजित पवार के नाम पर रखा जाएगा। यह केंद्र देशी गायों के संरक्षण, अनुसंधान और सुधार पर केंद्रित है, जिसका उद्देश्य दूध उत्पादन को बढ़ावा देना और किसानों को टिकाऊ कृषि में मार्गदर्शन करना है। यह पवार के योगदान का सम्मान है।