राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार नैसर्गिक साधन संपत्ती व मुबलक फुलोरा असणाऱ्या भागात मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
तसेच मध आणि मधामाशांपासून तयार होणारी उत्पादने यांची साखळी प्रक्रिया व विक्री व्यवस्था करणे, या माध्यमातून मधुपर्यटन करणे याकरीता "मधाचे गाव" ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार
१) घोलवड, ता. डहाणु, जि.पालघर
२) भंडारवाडी, ता. किनवट, जि. नांदेड
३) बोरझर, ता. नवापुर, जि. नंदुरबार
४) काकडदाभा, ता. औढानागनाथ, जि. हिंगोली
५) चाकोरे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
६) उडदावणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर
७) शेलमोहा, ता. गंगाखेड, जि. परभणी
८) सिंधीविहीर, ता. कारंजा, जि. वर्धा
९) सालोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
१०) आमझरी, ता. अमरावती, जि. अमरावती
वरील १० गांवात मधाचे गाव ही योजना राबविण्यासाठी एकूण रु.५,०१,९७,०००/- (अक्षरी रुपये पाच कोटी, एक लाख, सत्याण्णव हजार मात्र) इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.
कोणत्या गावाला किती निधी मंजूर?
अ.क्र | गावाचे नाव | मंजूर करण्यात आलेला निधी (रुपये लाखात) |
१ | घोलवड, ता. डहाणू, जि. पालघर | ५४ |
२ | भंडारवाडी, ता. किनवट, जि. नांदेड | ५३ |
३ | बोरझर, ता. नवापुर, जि. नंदुरबार | ४८ |
४ | काकडदाभा, ता. ओढानागनाथ, जि. हिंगोली | ४९ |
५ | चाकोरे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक | ४०.२२ |
६ | उडदावणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर | ४६.७५ |
७ | शेलमोहा, ता. गंगाखेड, जि. परभणी | ५४ |
८ | सिंधीविहीर, ता. कारंजा, जि. वर्धा | ५४ |
९ | सालोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा | ४९ |
१० | आमझरी, ता. अमरावती, जि. अमरावती | ५४ |
एकूण | ५०१.९७ |
अधिक वाचा: शेतीसाठी वय नव्हे हवी चिकाटी; ७० वर्षाचे शेतकरी विष्णुपंत यांनी १२ एकरवर फुलवली फळपिकांची शेती