Join us

१७४ कोटी रुपयांच्या पिक विम्याला मंजुरी; 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:52 IST

pik vima manjuri प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ या वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी तब्बल १७४ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. याबाबतची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्चात होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

२०२४-२५ च्या हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्चात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले आहे.

रब्बीचे मिळालेले अनुदानस्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ८ हजार ४६७ शेतकऱ्यांना ५ कोटी ६१ लाख रुपये. काढणीपश्चात नुकसान झालेल्या ९ हजार ५० शेतकऱ्यांना ११ कोटी २३ लाख रुपये. अनुदान मिळाले आहे.

अधिक वाचा: Kadvanchi Ranbhaji : पावसावर येणाऱ्या कडवंची रानभाजीला मोठी मागणी; कसे होतात आरोग्याला फायदे?

टॅग्स :पीक विमापाऊसशेतकरीशेतीअहिल्यानगरराधाकृष्ण विखे पाटीलपीकखरीपरब्बीकेंद्र सरकारकाढणी पश्चात तंत्रज्ञान