Lokmat Agro >शेतशिवार > फळपिके, फुलपिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज करा

फळपिके, फुलपिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज करा

Apply here for this plan for fruit crops, flower crops and bamboo cultivation | फळपिके, फुलपिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज करा

फळपिके, फुलपिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज करा

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा.

शेअर :

Join us
Join usNext

बारामती: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. असे आवाहन प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

फळबाग लागवड योजनेत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभूळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रूट, केळी, द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. गुलाब, मोगरा व निशीगंध या फुलपिकांसाठी व सन २०२४-२५ या वर्षात बांबू लागवड मोहीम स्वरूपात करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीस बारामती २४० हेक्टर, इंदापूर २३० हेक्टर, दौंड - २२२ हेक्टर व पुरंदर २२० हेक्टर असे एकूण ९१२ हेक्टरवर फळपीक, फुलपीक व बांबू लागवडीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी-जास्त करण्यास परवानगी आहे, परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष, विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादेतच देय राहील. अतिरिक्त कलमे, रोपे यांचे अनुदान दिले जाणार नाही.

लागवड वर्षासह सलग ३ वर्षांत मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांकरिता जे लाभार्थी ९० टक्के फळझाडे जिवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकांचे ७५ टक्के फळझाडे जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील.

वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी २० रोपे या मर्यादेत ही योजना राबविण्यात येते.

प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा कमीतकमी ०.०५ हेक्टर व जास्तीतजास्त २.०० हेक्टर आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. सातबारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक राहील.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना, तसेच अल्प व अत्यल्प, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी ग्रामपंचायतीचे जॉबकार्डधारक असावा, असे लाभार्थी निवडीचे निकष आहेत, अशी माहिती बांदल यांनी दिली.

Web Title: Apply here for this plan for fruit crops, flower crops and bamboo cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.