राजाराम लोंढे
कोल्हापूर : रासायनिक खतांचे दर चार महिन्यांपूर्वी वाढले असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर खासगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या दरातही १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
एकीकडे खते, बियाण्यांच्या दरात वाढ होत असताना शेतीमाल मात्र कवडीमोल दराने विकावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
अलीकडील काळात रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बियाण्यांच्या दरात प्रत्येक वर्षी वाढ होते. यंदा खासगी कंपन्यांच्या बियाणे १० ते २० टक्क्यांनी महागली आहेत.
सध्या बाजारात 'महाबीज' व खासगी कंपन्यांचे बियाणे उपलब्ध आहे. जादा उत्पादन देणारे वाण खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
यातून 'हायब्रीड'मध्ये '६४४४', '६१२९', '३१२' हे वाण आहेत. हे वाण महाग असून सरासरी ३८० रुपये किलोपर्यंत दर आहे.
'जेएस-३३५', 'जेएस-९३०५' सोयाबीनला मागणी
जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 'जेएस-३३५', 'जेएस-९३०५', 'डीएस-२२८' या वाणाला शेतकऱ्यांची मागणी आहे.
'इंद्रायणी' भात बियाण्याला मागणी
भाताचे विविध वाण असले तरी 'इंद्रायणी' वाणाला शेतकऱ्यांची अधिक पसंती आहे. उत्पादकता अधिक, खाण्यास चांगला आणि बियाण्याचा दर तुलनेत कमी असल्याने याची मागणी आहे.
पेरणीसाठी असे लागते बियाणे (एकरी)
२५ किलो (जुने)
१० ते १२ किलो (संशोधित)
६ किलो (हायब्रीड)
महाबीजच्या बियाण्यांचा दर असा, प्रतिकिलो
बियाणे - दर
ज्वारी - १२५ ते १३५
बाजरी - १०० ते १८०
मका - २३०
सूर्यफूल - ३९०
नाचणी - १३०
सोयाबीन - ६८ ते ७३
तूर - १७० ते १९०
मूग - १८० ते १९५
उडीद - १८० ते १९०
भात - ५२ ते ६२
महाबीजकडे पुरेसे बियाणे उपलब्ध असून, दोन-तीन दिवसांत विक्रेत्यांकडे ते पाठवले जाणार आहे. - अभय आष्टनकर, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज
अधिक वाचा: बियाणे घरचे असो अथवा विकतचे, पेरणी अगोदर ही सोपी तपासणी कराच? वाचा सविस्तर