या महिन्यात सुरूवातीपासून हवामान अनेक बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे या बदलत्या हवामानात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी त्यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषी सल्ला (Agro Advisory) देण्यात आला आहे ते वाचा सविस्तर.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून आज १५ व उद्या १६ जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर पुढील २ दिवसात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून आज १५ व उद्या १६ जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर पुढील २ दिवसात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १७ ते २३ जानेवारीदरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान (पहिल्या आठवड्यापेक्षा) जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या पाच दिवसात हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस : कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
तूर : काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
ज्वारी : रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
गहू : गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर ४० ते ४५ दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस) पाणी द्यावे.
मका : वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापनकेळी : केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळी पाणी द्यावे. केळी बागेस ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल १०% ईसी १० मिली किंवा मेटीराम ५५% + पायरॅक्लोस्ट्रोबीन ५% डब्ल्यू जी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी.
अंबा : आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे, बागेत परागीकरण व्यवस्थित होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारणी करू नये.
द्राक्ष : किमान तापमानात झालेल्या घटीमुळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमुळे द्राक्ष बागेत पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून व उबदार पणा रहावा यासाठी द्राक्ष घड पेपरने किंवा पिशव्याने झाकून घ्यावेत.
भाजीपाला
वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% एससी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १०% ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)हे ही वाचा सविस्तर : Agro Advisory : बदलत्या हवामानात असे करा पिकांचे नियोजन