जालना : शेतकऱ्यांना स्थानिक व जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी वर्ल्ड बँकेने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प योजना सुरू केली आहे. (Agriculture Smart Project)
या योजनेंतर्गत जिल्ह्यात २८ स्मार्ट प्रकल्पांची नोंद झालेली आहे. त्यापैकी मोसंबी ग्रिडिंग करणे व सोयाबीन व इतर धान्य स्वच्छ करून विक्री करण्याचे ५ असे एकूण १७ प्रकल्प सुरू झाले आहेत. (Agriculture Smart Project)
सात वर्षाचा कालावधी असलेल्या या प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांना उत्पादक भागीदारी प्रकल्पांतर्गत बियाणे व खते उत्पादक व विक्रेते, शेतमाल उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, आडते, खरेदीदार व्यापारी, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक यांना व्यवसाय करता येतो. (Agriculture Smart Project)
जालना जिल्हा हा मोसंबीचे आगार मानला जातो. त्यामुळे जिल्ह्यात मोसंबी ग्रिडिंग करण्याचे अधिक प्रकल्प आहेत. त्यापाठोपाठ सोयाबीन, तूर, हरभरा ग्रिडिंग करण्याचा प्रकल्प दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कांदाचाळ, अद्ययावत औजारे गोदाम, भाजीपाला प्रक्रिया असे स्मार्ट प्रकल्प आहेत. २८ स्मार्ट प्रकल्पांची जिल्ह्यात नोंद झालेली आहे. त्यापैकी १७ प्रकल्प सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Agriculture Smart Project)
शेतकरी उत्पादक कंपनी व खरेदी विक्री प्रक्रिया उद्योग अर्थात स्मार्ट प्रकल्पासाठी शेतकरी लाभार्थ्यांचा वाटा ४० टक्के असावा लागतो. त्यानंतर वर्ल्ड बँकेकडून ६० टक्के अर्थसाह्य करण्यात येते. (Agriculture Smart Project)
विशेष म्हणजे यासाठी किमान २५० भागधारक शेतकरी असावे लागतात. याशिवाय किमान ५ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल असणे गरजेचे आहे. तेव्हाच वर्ल्ड बँकेकडून अर्थसाह्य केले जाते. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्मार्ट प्रकल्प उभारणीकडे मोर्चा वळविला असून, शेतकरी फार्मा प्रड्यूसर कंपनींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.
... असे आहेत योजनेची उद्दिष्टे
महिलांना शेतकरी दर्जा प्राप्त करून देणे, कृषीविषयक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे, शेतीविषयक तंत्राची हाताळणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, विक्री व व्यवस्थापन प्रक्रियेत सहभाग वाढविणे असे या योजनेची उद्दिष्टे आहेत.
या पायाभूत सुविधांसाठी दिले जाते अनुदान
काढणीपश्चात, प्रक्रिया आणि विपणन बाबी यासाठी मूलभूत सुविधा उदा. गोदाम, स्वच्छता छाननी व प्रतवारी युनिट, एकत्रीकरण युनिट, प्रक्रिया युनिट, कांदाचाळ, संकलन केंद्र, जिनिंग आणि प्रेसिंग युनिट, ग्रिडिंग व पॅकिंग युनिट व कृषी पिकाकरिता चाचणी प्रयोगशाळा यासाठी अनुदान दिले जाते.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांत स्मार्ट प्रकल्पाची कामे सुरू आहेत. काही मोसंबी ग्रिडिंग व सोयाबीन प्रकल्पाची कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. - श्रीकांत देशपांडे, प्रकल्प अधिकारी, जालना