Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची धाड; कासोद्यात ३४१८ गोण्या युरिया साठा जप्त

युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची धाड; कासोद्यात ३४१८ गोण्या युरिया साठा जप्त

Agriculture Department raids after complaint of urea shortage; 3418 bags of urea stock seized in Kasodya | युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची धाड; कासोद्यात ३४१८ गोण्या युरिया साठा जप्त

युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची धाड; कासोद्यात ३४१८ गोण्या युरिया साठा जप्त

युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण पथकाने कासोदा (ता. एरंडोल) येथे धाड टाकून तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त केला. शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नाही, असे सांगत जास्त दराने विक्री करून लूट केल्याचा आरोप होत असून संबंधित परवानाधारकांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण पथकाने कासोदा (ता. एरंडोल) येथे धाड टाकून तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त केला. शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नाही, असे सांगत जास्त दराने विक्री करून लूट केल्याचा आरोप होत असून संबंधित परवानाधारकांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण पथकाने जळगाव जिल्ह्याच्या कासोदा (ता. एरंडोल) येथे धाड टाकून सहा दुकानांत तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त केला. शेतकऱ्यांना युरिया शिल्लक नाही, असे सांगत जास्त दराने विक्री करून लूट केल्याचा आरोप होत असून संबंधित परवानाधारकांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

लहुराज विश्राम मराठे, जितेंद्र परशुराम तांदळे आदी शेतकऱ्यांनी युरिया उपलब्ध नसल्याची तक्रार जिल्हा कृषी विभागाकडे केली होती. त्यानंतर १८ तारखेला सकाळी सुमारे १० वाजता तपासणी पथक कासोद्यात दाखल झाले. पथकात जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विकास बोरसे व तालुका गुणवत्ता नियंत्रक निखिल टोळकर यांचा समावेश होता.

पथकाने गावातील खत विक्रेत्यांच्या गोदामाची तपासणी केली असता सर्वत्र युरियाचा मोठा साठा आढळून आला. मात्र शेतकऱ्यांना खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. अव्वाच्या सव्वा दराने विक्री, तसेच नको असलेल्या खतांची अट घालून विक्री केल्याचेही समोर आले आहे. काही ठिकाणी २०१८ सालच्या मुदत संपलेल्या खतांच्या व बियाण्यांच्या गोण्या आढळल्याची, तसेच बोगस खतांचा संशय असल्याची चर्चा आहे.

अनेक दुकानांची दिवसभर तपासणी, चौकशीकडे लक्ष

• प्रविण हार्डवेअर व कृषी केंद्र, आबासाहेब खंडेराव फुटसेल सोसायटी, साई कृषी केंद्र, सूर्यवंशी कृषी केंद्र, सुदर्शन कृषी केंद्र, गणेश पुंडलीक वाणी कृषी केंद्र, जाजू ॲग्रो केंद्र आदी दुकानांची दिवसभर तपासणी करण्यात आली.

• दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई अचानक करण्यात आली आहे. पुढील चौकशीत आणखी काय निष्पन्न होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

• अचानक करण्यात आलेल्या या तपासणीमुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

युरिया व इतर खते खरेदी करताना आधारकार्ड सोबत न्यावे. आधार लिंक करूनच खरेदी करावी. किती व कोणती खते विक्री झाली, याची खात्री करावी. पक्क्या बिलाशिवाय खते किंवा निविष्ठा खरेदी करू नयेत. खतांबाबत तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा; तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून चौकशी करून योग्य दंडात्मक कारवाई केली जाईल. - पद्मनाभ म्हस्के, जिल्हा कृषि विकास अधिकारी, जळगाव.

हेही वाचा : शेतं संपून गेली तर माणसं काय खातील? गावोगावी शेतांची भासतेय कमतरता, घरांची मात्र पडतेय भर

Web Title : यूरिया की कमी की शिकायतों के बाद छापा; कासोदा में 3418 बैग जब्त।

Web Summary : यूरिया की कमी की शिकायतों के बाद, कृषि अधिकारियों ने कासोदा में छापा मारा और छह दुकानों से 3418 बैग जब्त किए। किसानों से कथित तौर पर अधिक शुल्क लिया गया, कुछ दुकानें एक्सपायर्ड या संदिग्ध उर्वरक बेच रही थीं। जांच चल रही है।

Web Title : Raid after urea shortage complaints; 3418 bags seized in Kasoda.

Web Summary : Following urea shortage complaints, agricultural authorities raided Kasoda, seizing 3418 bags from six shops. Farmers were allegedly overcharged, with some shops selling expired or dubious fertilizers. An investigation is underway.