पुणे : केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे.
त्यात सर्वाधिक १५ हजार ९४० पंप जालना जिल्ह्यात बसविण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात २ हजार ७१७ पंप बसविण्यात आले आहेत. या योजनेत आतापर्यंत राज्यातून ३ लाख ८९,२९४ अर्ज आले आहेत. त्यातील २ लाख ६४ हजार ४७४ अर्जाना मंजुरी देण्यात आली.
राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्य सरकारने राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यात ११ डिसेंबरपर्यंत १ लाख १ हजार ४६२ सौर कृषिपंप बसविले आहेत. यात सर्वाधिक १५ हजार ९४० पंप जालना जिल्ह्यात बसविले आहेत. बीडमध्ये १४ हजार ७०५, परभणीत ९ हजार ३३४ पंप बसविले आहेत.
राज्यात आतापर्यंत ३ लाख ८९ हजार २९४ अर्ज आले आहेत. त्यातील २ लाख ६४ हजार ४७४ अर्जाना मंजुरी दिली आहे. त्यातील २ लाख २१ हजार ४०० शेतकऱ्यांनी स्व-हिस्सा भरला असून, २ लाख २० हजार ३५१ शेतकऱ्यांनी सौर वीजनिर्मिती पॅनेलचा पुरवठादारही निवडला आहे. त्यातील १ लाख ८७ हजार ८६४ पंपांसाठी वर्कऑर्डर देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री कुसूम योजना
• या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के, तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो.
• अनुसूचित जाती व अनुसूचितत शेतकऱ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
• महावितरणने आतापर्यंत गेल्या काही वर्षात विविध योजनांच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून २ लाख सौर कृषिपंप बसविले असून, त्यापैकी एक लाख पंप मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत या वर्षी बसविले आहेत.
जिल्हानिहाय बसविलेले सौरपंप
जिल्हा | बसविलेले सौर पंप | जिल्हा | बसविलेले सौर पंप | जिल्हा | बसविलेले सौर पंप | जिल्हा | बसविलेले सौर पंप |
जालना | १५,९४०२ | जळगाव | ४,३१६ | यवतमाळ | १,७४३ | गडचिरोली | ४०३ |
बीड | १४,७०५ | बुलढाणा | ३,९१४ | नंदूरबार | १,३७४ | अमरावती | २२५ |
परभणी | ९,३३४ | नांदेड | ३,०९५ | सांगली | ९३८ | नागपूर | १६१ |
अहिल्यानगर | ९,३३४ | सोलापूर | २,९४५ | भंडारा | ९१० | ठाणे | १५३ |
छत्रपती संभाजीनगर | ७,६३० | पुणे | २,७१७ | सातारा | ८९९ | चंद्रपूर | १२० |
हिंगोली | ६,०१४ | लातूर | २,३१४ | अकोला | ८६१ | वर्धा | ७२ |
नाशिक | ४,७७८ | धुळे | २,११६ | कोल्हापूर | ७२२ | पालघर | ६४ |
धाराशिव | ४,३४७ | वाशिम | १,८३६ | गोंदिया | ४९३ | ||
रत्नागिरी | २७ | सिंधुदुर्ग | १ | रायगड | २८ |
एकूण १,०१,४६२
हेही वाचा : शाळेतील शेतकऱ्यांची मुलं म्हणताहेत 'आमची भाजी आम्ही पिकवू'