Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > तब्बल २० वर्षानंतर राज्य महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल; ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी

तब्बल २० वर्षानंतर राज्य महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल; ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी

After 20 years, major changes in the structure of the State Revenue Department; 35 thousand 876 posts approved | तब्बल २० वर्षानंतर राज्य महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल; ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी

तब्बल २० वर्षानंतर राज्य महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल; ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी

mahasul vibhag akrutibandh राज्य सरकारने तब्बल वीस वर्षानंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिल्याने आता महसूल विभागात एकूण ३५ हजार ८७६ पदे असतील.

mahasul vibhag akrutibandh राज्य सरकारने तब्बल वीस वर्षानंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिल्याने आता महसूल विभागात एकूण ३५ हजार ८७६ पदे असतील.

पुणे: राज्य सरकारने तब्बल वीस वर्षानंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिल्याने आता महसूल विभागात एकूण ३५ हजार ८७६ पदे असतील.

महसूल विभागातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने राज्यातील सहा महसूल विभागांत ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन होणार आहेत.

तसेच ८ नवीन उपविभागीय कार्यालय, २ तहसीलदार कार्यालये, ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालये स्थापन होणार आहेत. नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया आता जिल्हाधिकारी स्तरावर वेगाने पूर्ण होईल.

महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंधास राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून, एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी दिली आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क, भूमी अभिलेख आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांचा सुधारित आकृतिबंध आहे. वीस वर्षांनंतर प्रथमच महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध मान्यता मिळाली आहे.

याआधी, महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध २००६ मध्ये झाला होता. परंतु मागील वीस वर्षांत महसूल व बिगर महसुली कामात अनेक बदल झाले.

त्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढाकर घेत महसूल विभागाच्या सुधारीत आकृतिबंध करण्यासाठी माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांची समिती नेमली होती.

या समितीने केलेल्या शिफारशीनार महसूल विभागातील ३४ हजार ५७६ नियमित व १३०० बाह्यस्रोतांद्वारे असे मिळून ३५ हजार ८७६ पदांचा आकृतिबंध तयार केला होता.

नवीन संरचनेत विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यालयांचा समावेश
◼️ विभागीय आयुक्तालये - ६
◼️ जिल्हाधिकारी कार्यालये - ३६
◼️ महसूल उपविभागीय कार्यालये - १९२
◼️ तहसीलदार कार्यालये - ३६०
◼️ मंडळ कार्यालये - २,६२५
◼️ तलाठी सजा - १५,७४७
◼️ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये - ११
◼️ नवीन उपविभागीय कार्यालये - ८
◼️ तहसीलदार कार्यालय - २
◼️ अतिरिक्त तहसीलदार कार्यालये - ६९

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून, काळानुरूप वाढलेला कामाचा व्याप आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रशासकीय कामात अधिक सुसूत्रता येईल, नवीन कार्यालयांमुळे जनतेला कामासाठी दूर जावे लागणार नाही आणि कामकाजात मोठी गती येईल. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

अधिक वाचा: Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गाचा रूट बदलल्यामुळे 'या' गावांना लागली लॉटरी; दुर्गम भागाचा होणार कायापालट

Web Title : 20 साल बाद महाराष्ट्र राजस्व विभाग का पुनर्गठन; 35,876 पदों को मंजूरी

Web Summary : महाराष्ट्र के राजस्व विभाग में 20 साल बाद बड़ा बदलाव, 35,876 पदों को मंजूरी। राज्य के छह राजस्व मंडलों में दक्षता और सार्वजनिक सेवा वितरण में सुधार के लिए ग्यारह नए अतिरिक्त जिला कलेक्टर कार्यालय, आठ उप-विभागीय कार्यालय और उनहत्तर अतिरिक्त तहसीलदार कार्यालय स्थापित किए जाएंगे।

Web Title : Maharashtra Revenue Department Restructuring After 20 Years; 35,876 Posts Approved

Web Summary : Maharashtra's Revenue Department sees major restructuring after 20 years, approving 35,876 posts. Eleven new additional district collector offices, eight sub-divisional offices, and sixty-nine additional tehsildar offices will be established to improve efficiency and public service delivery across the state's six revenue divisions.