Aadhar Card : आजकाल आधार कार्ड(Aadhar Card) कोणत्याही शासकीय योजनांसाठी महत्वपूर्ण ठरणारा घटक आहे. त्यामुळे वेळोवेळी आधाराची माहिती (Information) अपडेट करणे गरजेचे आहे.
शिवाय अनेकदा शासकीय अर्ज करताना अचूक माहिती द्यावी लागते. अन्यथा संपूर्ण प्रक्रिया नव्याने करण्याची वेळ येते. असेच एक उदाहरण धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आले आहे. आधाराची माहिती (Information) चुकल्याने शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.(Aadhar Card)
या भागातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चूक केली. परंतु, ती अजूनही दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे जवळपास १०० शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.(Aadhar Card) कमी किमतीत शेतमाल विकलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान (वाढीव फरकाची रक्कम) जाहीर केले होते.
दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत असणाऱ्या या अनुदानासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. यासाठी कापूस व सायोबीन पिकांसाठी कमाल पाच हजार रुपये अनुदान देण्यात आले.
बहुतांश शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. परंतु जवळपास शंभर शेतकरी लाभापासून वंचित आहे. शेतकऱ्यांच्या आधारकार्डमध्ये चूक असल्यामुळे त्यांना अनुदान मिळालेले नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्रमांक अपलोड करण्याचे काम कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी आधारकार्ड दिल्यानंतरही केवळ कर्मचाऱ्यांनी नोंदी करताना केलेला हलगर्जीपणा शेतकऱ्यांना मानसिक त्रास देणारा ठरला आहे.
कृषी विभागाकडे तक्रार
शेतकरी पांडुरंग कुदुसे यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. वारंवार चकरा मारूनही केवळ आधारकार्ड नंबर दुरुस्तीचे काम सुरू आहे, लवकरच अनुदान मिळेल, असे सांगितले जाते. परंतु तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतही अनुदान देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कृषी अधिकारी म्हणाले, दुरुस्तीची यादी पाठविली
शेतकऱ्यांच्या आधारकार्डमध्ये घोळ झाल्याने अनुदान वाटप करताना अडचणी आल्या. यात जवळपास शंभर शेतकऱ्यांची संख्या आहे. आता आधारकार्ड नंबर दुरुस्त करण्यात आले आहे. दुरुस्त केलेली यादी वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे. लवकरच अनुदान मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे यांनी सांगितले.
हे ही वाचा सविस्तर : CMEGP Scheme: काय आहे मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम जाणून घ्या सविस्तर