lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane FRP राज्यातील ९६ तर सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी थकवली एफआरपी

Sugarcane FRP राज्यातील ९६ तर सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी थकवली एफआरपी

96 factories in the state and 23 factories in Solapur district have exhausted FRP | Sugarcane FRP राज्यातील ९६ तर सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी थकवली एफआरपी

Sugarcane FRP राज्यातील ९६ तर सोलापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी थकवली एफआरपी

६० टक्क्यांपर्यंत उसाचे पैसे न दिलेल्या राज्यातील साखर कारखान्यांची संख्या १५ आहे. एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिलेले राज्यातील २९ साखर कारखाने आहेत.

६० टक्क्यांपर्यंत उसाचे पैसे न दिलेल्या राज्यातील साखर कारखान्यांची संख्या १५ आहे. एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिलेले राज्यातील २९ साखर कारखाने आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

अरुण बारसकर
सोलापूर : साखर कारखान्यांचे पट्टे पडून दोन महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे चुकते झाले नाहीत. राज्यातीत ९६ कारखान्यांनी १८१४ कोटी, तर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी २८५ कोटी रुपये अडकवले आहेत.

६० टक्क्यांपर्यंत उसाचे पैसे न दिलेल्या राज्यातील साखर कारखान्यांची संख्या १५ आहे. एफआरपीनुसार शेतकऱ्यांचे पैसे दिलेले राज्यातील २९ साखर कारखाने आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सोलापूर, लोकनेते बाबूराव अण्णा पाटील, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, इंद्रेश्वर शुगर बार्शी, भैरवनाथ विहाळ, भैरवनाथ आलेगाव, जय हिंद आचेगाव, धाराशिव शुगर सांगोला या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

उसाचे संपूर्ण पैसे दिलेले १३ साखर कारखाने असून १० कारखान्यांनी ९० टक्क्यांपर्यंत पैसे दिले आहेत.

अर्ज व विनंती करूनही पैसे मिळेनात
-
पाऊस कमी पडल्याने पाणी कमी झाले किंवा पाणी नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध करण्यासाठी पैसे नाहीत. घरात दवाखान्यासाठी पैशाची गरज आहे. इतरांकडून घेतलेले पैसे द्यायचे आहेत. मात्र, उसाचे बिल कारखान्यांकडून जमा होत नाही.
शेतकरी अर्ज करीत आहेत, फोन करीत आहेत, कारखान्यांवर अधिकाऱ्यांना भेटत आहेत, मात्र पैसे काही जमा केले जात नाहीत. १४ महिने ऊस सांभाळण्यासाठी खर्च, ऊस घालवायचे पैसे मोजूनही कारखाना पैसे देत नसल्याचे संपूर्ण जिल्हातच चित्र आहे.

यांनी दिली संपूर्ण रक्कम
पांडुरंग श्रीपूर व युरोपियन शुगर (१०५ टक्के), सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील (२०७ टक्के), विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब ( ११२टक्के), आष्टी शुगर, गोकुळ शुगर व व्ही.पी. शुगर (११८ टक्के), ओंकार शुगर, चांदापुरी (११३ टक्के), सीताराम महाराज खर्डी (१०० टक्के), शंकर सहकारी ( १०९ टक्के), तर आवताडे शुगर कारखान्याने १०३ टक्क्यांपर्यंत एफआरपी व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे.

एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना नोटीस देऊन सुनावणी घेतली आहे. पैसे देतो म्हणून मुदत मागून घेतात मात्र पैसे देत नाहीत. अशा कारखान्यांची आर.आर.सी. करण्यासाठी प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाला सादर केला आहे. - पांडुरंग साठे, प्रादेशिक उपसंचालक (साखर)

अधिक वाचा: मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवायचाय; तर करा ह्या पिकांची लागवड

Web Title: 96 factories in the state and 23 factories in Solapur district have exhausted FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.