सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीतजळगाव जिल्ह्यातील ८०९ हेक्टर क्षेत्र खरडून निघाले आहे. या जमिनीसह ३३ टक्क्यांवर हानी झालेल्या २ लाख ६२ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रापोटी प्रशासनाने ३१४ कोटी ६० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे.
सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीने कहर केला होता. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, पारोळा, एरंडोलसह जळगाव तालुक्यात प्रचंड नुकसान झाले होते. पुराच्या पाण्याच्या प्रवाहात शेतजमिनी खरडून निघाल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील पिकांचे झालेले नुकसान दृष्टिक्षेपात
क्षेत्राचा प्रकार | बाधित | बाधित क्षेत्र (हे.) | अपेक्षित निधी (लाखात) |
जिरायत | १९९२२६४ | १६६२२७ | १४१२९ |
बागायत | ११५९८१ | ८०३६८ | १३६६२ |
फळपिके | २२९१० | १६३०३ | ३६६८ |
एकूण | ३३८१५५ | २६२८९८ | ३१४६० |
याशिवाय कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले होते. त्यानुसार जिल्ह्यात ८०९ हेक्टर क्षेत्रावरची शेतजमीन खरडून निघाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या शेतजमिनीसह जिल्हा प्रशासनाने बाधित २ लाख ६२ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांच्या नुकसानीपोटी ३१४ कोटी ६० लाख रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यात चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातील सर्वाधिक भरपाईच्या रकमेचा समावेश आहे.