Join us

राज्यात ५ लाख लाईट बिले झाली पेपरलेस, वर्षाला मिळतेय १२० रुपयांची सवलत; कसा घ्याल फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:20 IST

go green light bill महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडता येतो.

पुणे : महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडता येतो.

असा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांची संख्या आता ५ लाखांवर पोहोचली असून एकूण संख्या ५ लाख ३ हजार ७९५ इतकी झाली आहे. यातून वीजग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.

पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल अॅप व संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या योजनेत वीजबिलासाठी कागदी बिलाऐवजी 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे.

ग्राहकांचा वीजबिलात वार्षिक १२० रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे. पर्याय निवडल्यानंतर पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे.

गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन वार्षिक १२० रुपयांचा आर्थिक फायदा कसा घ्यायचा यासाठी वाचावीज बिलासाठी हे पर्याय निवडाल तर बिलात मिळेल १० रुपयांची सवलत; वाचा सविस्तर

पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर◼️ या योजनेत आतापर्यंत ५ लाख ३ हजार ७९५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत.◼️ या ग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.◼️ यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक २ लाख १ हजार २३३ सहभागी झाले असून त्यांना २ कोटी ४२ लाख रुपयांचा फायदा होत आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा: Jalsandharan Vibhag Bharti : जलसंधारण खात्याच्या ८,७६७ रिक्त पदांच्या भरतीस मान्यता; लवकरच कार्यवाही

टॅग्स :महावितरणबिलवीजमहाराष्ट्रमोबाइलऑनलाइनपर्यावरण