Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात ४०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होणार; काय आहे उपक्रम? कसा मिळणार लाभ?

राज्यात ४०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होणार; काय आहे उपक्रम? कसा मिळणार लाभ?

400 women farmer producer companies to be formed in the state; What is the initiative? How will the benefits be obtained? | राज्यात ४०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होणार; काय आहे उपक्रम? कसा मिळणार लाभ?

राज्यात ४०० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होणार; काय आहे उपक्रम? कसा मिळणार लाभ?

women farmers fpo राज्यातील महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य सरकारने ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले असून, या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी महिलांचे सशक्तीकरण करण्यात येणार आहे.

women farmers fpo राज्यातील महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य सरकारने ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले असून, या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी महिलांचे सशक्तीकरण करण्यात येणार आहे.

पुणे: राज्यातील महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य सरकारने ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले असून, या अभियानाच्या माध्यमातून शेतकरीमहिलांचे सशक्तीकरण करण्यात येणार आहे.

या माध्यमातून महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसाहाय्य देखील देण्यात येणार आहे.

राज्यात आतापर्यंत ७५ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली असून, आणखी ४०० महिला शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्याचे काम चालू असून, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला शेतकरी सशक्तीकरण योजना सुरू केली आहे.

या योजनेसाठी केंद्र आणि राज्याच्या सहभागासाठी आर्थिक हिस्सा असणार आहे. या योजनेतून महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न आहेत.

असे आहेत उपक्रम
◼️ सशक्तीकरणासाठी महिला शेतकऱ्यांचा समूहात सहभाग बंधनकारक आहे.
◼️ या माध्यमातून महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
◼️ कृषीवरील उपजीविकांसाठी (पशुपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया) तांत्रिक मार्गदर्शन व अर्थसाह्य उपलब्ध आहे.
◼️ प्रथम ग्रामीण भागातील गरीब, वंचित कुटुंबांमध्ये महिला स्वयंसहायता गट तयार करणे.
◼️ समूहांना बँकिंग, बचत, कर्ज, वित्त व्यवहार यांची माहिती देणे आणि त्यांची क्षमता वाढविणे.

लाभार्थी व पात्रता
◼️ ग्रामीण भागातील गरीब व अत्यंत गरीब कुटुंबातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये सहभागी असणाऱ्या किंवा सहभागी होणाऱ्या महिलांना विशेष प्रोत्साहन देणे.
◼️ योजनेंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १० कोटी २० लाख २९ हजार एवढा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे.
◼️ या योजनेसाठी केंद्र सरकारने त्यांचा हिस्सा सुमारे ७ कोटी २७ लाख ८६ हजार एवढा दिला आहे.

अधिक वाचा: राज्यातील 'या' वीजग्राहकांना मिळणार आता २५ वर्षे मोफत वीज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

Web Title: 400 women farmer producer companies to be formed in the state; What is the initiative? How will the benefits be obtained?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.