Join us

नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ३,५९१ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2023 15:37 IST

नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३५९१.४६ कोटी रुपयांची गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) प्रदान केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करीत याची माहिती दिली.

नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३५९१.४६ कोटी रुपयांची गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) प्रदान केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करीत याची माहिती दिली. या मान्यतेनंतर या प्रकल्पाला गती येणार आहे. भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस आदी भागांना याचा मोठा लाभ होईल असे सांगत फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानले आहेत. या प्रकल्पासाठी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता.

दुष्काळी भागासाठी नीरा-देवघर-पाणीप्रकल्प महत्त्वाचा आहे. अनेक वर्षे प्रकल्प रखडला होता. याबाबत ३ ऑक्टोबरला दिल्लीत केंद्रीय जलसंपदा विभागाच्या अर्थ व गुंतवणूक समितीची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीस माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जलशक्ती मंत्रालयाच्या सचिव देबश्री मुखर्जी, जलशक्ती मंत्री यांचे खासगी सचिव उदय चौधरी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता गुणाले, नीरा देवघर प्रदाकल्पाचे कार्यकारी अभियंता कोडुलकर आदी उपस्थित होते. या बैठकीत हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली होती.

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पधरणकेंद्र सरकाररणजितसिंह नाईक-निंबाळकरफलटणमाळशिरसभोरशेतकरीदुष्काळदेवेंद्र फडणवीस