सांगली : महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामांना वेग देण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रलंबित कामांना मार्गस्थ करण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन केले आहे.
या अभियानाअंतर्गत प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, जात आणि रहिवासी प्रमाणपत्र, तसेच घरपट्टी वाटप अशा विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात हे अभियान ७ मार्च ते १५ मे दरम्यान राबविण्यात येणार असून मंडलस्तरावर शिबिरे होणार आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबवले जाणारे एक महत्त्वाचे अभियान आहे.
हे अभियान प्रशासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी राबवले जाते, ज्याद्वारे जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र आणि फेरफार यांसारख्या १६ महत्त्वाच्या सेवा थेट गावातच उपलब्ध करून दिल्या जातात.
जमीन नोंदी, फेरफार, सातबारा दुरुस्ती, अभिलेखातील चुका अशा महसूल विषयक तक्रारींचा शिबिरातच आढावा घेऊन शक्य त्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात येणार आहे.
या शिबिरांमध्ये महसूल विभागाच्या एकूण १५ प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
फेरफार निकाली काढणारमहसूल विभागाकडे प्रलंबित असलेल्या फेरफार प्रकरणांचा विशेष आढावा घेऊन त्यांचा तातडीने निपटारा करण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. त्यामुळे जमीन व्यवहाराशी संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
एकाच छताखाली मिळणार या सेवा◼️ या शिबिरांमध्ये महसूल विभागाच्या एकूण १५ प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.◼️ यात प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, डिजिटल सातबारा व ८-अ उतारा वाटप, उत्पन्न, जात व रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, इत्यादी दाखले विद्यार्थ्यांना देणे.◼️ सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसाह्य लाभ, अकृषिक तरतुदी मार्गदर्शन, तुकडेबंदी कायदा प्रकरणे, पाणंद रस्ते मान्यता आदेश, घरपट्टे वाटप, मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, भूसंपादन नोंदी आदी सेवांचा समावेश आहे.
महसूलविषयक तक्रारींचा जागेवरच निपटाराजमीन नोंदी, फेरफार, सातबारा दुरुस्ती, अभिलेखातील चुका अशा महसूल विषयक तक्रारींचा शिबिरातच आढावा घेऊन शक्य त्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची प्रतीक्षा कमी होणार असून कामे जलद मार्गी लागतील.
अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क उभारणार◼️ शिबिरांमध्ये विशेष अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क उभारण्यात येणार आहे.◼️ जमीन अभिलेखातील नाव, क्षेत्रफळ, नोंदीतील चुका किंवा विसंगती याबाबत मार्गदर्शन आणि दुरुस्तीची प्रक्रिया येथे करण्यात येईल
महसूल विभागाच्या सेवा जलद पोहोचाव्यात यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' राबविण्यात येत आहे. शिबिरांमधून प्रलंबित प्रकरणे निकाली काढून नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा देण्यावर भर दिला जाईल. - अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली
अधिक वाचा: राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी; आता दस्त नोंदणीला किती रुपये?
Web Summary : Maharashtra's 'Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswayam Samadhan' campaign offers 15 types of revenue services, including land record corrections and certificate issuance, at one location. The initiative aims to expedite pending cases and resolve land-related grievances, running from March 7th to May 15th across the state.
Web Summary : महाराष्ट्र का 'छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान' अभियान एक ही स्थान पर भूमि रिकॉर्ड सुधार और प्रमाण पत्र जारी करने सहित 15 प्रकार की राजस्व सेवाएं प्रदान करता है। इस पहल का उद्देश्य लंबित मामलों में तेजी लाना और भूमि संबंधी शिकायतों का समाधान करना है, जो 7 मार्च से 15 मई तक पूरे राज्य में चलेगा।